‘लैला-मजनू’ची लूटमार... अब तक 23--घरात भांडाफोड होईल या भीतीने तक्रार देण्यास टाळाटाळ , सातारा परिसरात नऊ ठिकाणे निर्जनस्थळे:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:43 PM2017-12-22T23:43:26+5:302017-12-22T23:50:02+5:30

सातारा : निर्जळस्थळी प्रेमीयुगुलांना लुटणाºया टोळीला अटक झाल्यानंतर तीन वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा मिळाला. गेल्या तीन वर्षांत तब्बल २३ प्रेमीयुगुलांना लुटल्याचे पोलिसांत गुन्हे

 Laila-Majnu robbery ... Till now, 23 people will be scared of lodging, nine places in Satara area, desert areas: | ‘लैला-मजनू’ची लूटमार... अब तक 23--घरात भांडाफोड होईल या भीतीने तक्रार देण्यास टाळाटाळ , सातारा परिसरात नऊ ठिकाणे निर्जनस्थळे:

‘लैला-मजनू’ची लूटमार... अब तक 23--घरात भांडाफोड होईल या भीतीने तक्रार देण्यास टाळाटाळ , सातारा परिसरात नऊ ठिकाणे निर्जनस्थळे:

Next

सातारा : निर्जळस्थळी प्रेमीयुगुलांना लुटणाºया टोळीला अटक झाल्यानंतर तीन वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा मिळाला. गेल्या तीन वर्षांत तब्बल २३ प्रेमीयुगुलांना लुटल्याचे पोलिसांत गुन्हे दाखल आहेत.

कास पठार, बामणोली, सज्जनगड परिसर, कण्हेर धरण, कोंडवे, लिंबखिंडी, खिंडवाडी, अजिंक्यतारा परिसर, वाढे फाटा या नऊ ठिकाणी या घटना घडल्या असल्याचे समोर आले आहे. विशेषत: दुपारी आणि सायंकाळी लुटीचे प्रकार घडले आहेत. निर्जनस्थळी जोडपे बसल्यानंतर त्यांना तुमच्या घरातील लोकांना सांगण्याची धमकी देत ऐवज काढून घेतले जात होते. अनेकदा युवतींशी गैर वर्तवणूकही होत असतात. मात्र भीतीपोटी कोणीही तक्रार द्यायला धजावत नाहीत, असा पोलिसांचा आतापर्यंतचा अनुभव आहे. वर्षभरापूर्वी कण्हेर परिसरात एका जोडप्याला रात्रीच्या सुमारास लुटण्यात आले होते. संबंधित युवतीचा विनयभंगाचाही प्रयत्न झाला होता. मात्र, त्यावेळी संबंधित युवतीने तक्रार दिल्यानंतर लुटमारीचा प्रकार उघडकीस आला.

सातारा शहर व परिसरात पूर्वी प्रेमीयुगुलांना लुटण्याचे प्रकार प्रचंड वाढले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी एकेकाला अटक करत या टोळीचा पर्दाफाश केला. परंतु काही महिन्यांनंतर पुन्हा प्रेमीयुगुलांना लुटण्याचे प्रकार वाढू लागले. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली. माण तालुक्यातील दीपक मसुगडे आणि सम्राट खरात या दोघांना पकडल्यानंतर अजूनही प्रेमीयुगुलांना लुटण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले.

हेल्मेटधारी युवक... स्कार्फधारी युवती
सायगाव : जावळी तालुक्यातील श्रीक्षेत्र मेरुलिंग डोंगरात दिवसेंदिवस प्रेमीयुगुलांचा वावर वाढत चालला आहे. अनेकदा या घाटात घनदाट झाडीचा फायदा घेऊन दुचाकी वाहनावरून स्कार्फधारी युवती ‘धूमस्टाईल’ने जाताना आढळतात. आता तर चारचाकी वाहनांमधूनही याठिकाणी युवक-युवती फिरताना आढळतात. आतापर्यंत या डोंगरावर प्रेमीयुगुलांना लुटण्याचे प्रकार घडले नसले तरी अनेकदा पाठलाग करण्यासारख्या घटना घडल्या आहेत.

प्रेमीयुगुलांच्या चाळ्यांमुळे श्री क्षेत्र मेरुलिंगचे पावित्र्य धोक्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांनी अनेकदा मेढा पोलिसांना याबाबत तक्रारीदेखील केल्या आहेत. अलीकडे दिवसा तसेच रात्रीच्या वेळीही चारचाकी वाहनांमधून प्रेमीयुगुल येताना आढळतात. प्रेमीयुगुलांना हा डोंगर सुरक्षित वाटत असला तरी प्रेमीयुगुलांवर पाळत ठेवून पाठलाग करण्यासारख्या घटना घडल्या आहेत. तर काही वेळेला लुटण्याचे प्रकार होऊन देखील नाव समोर येऊ नये, यामुळे तक्रार झाली नाही.

दागिने अन्  रोकडवर डोळा
प्रेमीयुगुलांना लुटताना त्यांच्याकडील दागिने आणि रोकडवर टोळक्याकडून लक्ष्य केले जाते. चाकू किंवा सुºयाचा धाक दाखवून मोबाईलही हिसकावून घेतले जातात. जेणेकरून संबंधित जोडप्याने फोन करून कोणाला याची माहिती देऊ नये, याची खबरदारी चोरटे घेत असतात.

कास नको... नवे पर्याय तय्यार !
कास पठाराला जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरविण्यात आले आणि येथे युगुलांचा वावर कमी होत गेला. सहकुटुंब सहली या रस्त्याने निघू लागल्याने प्रेमीयुगुलांनी आता कण्हेर, जावळी, मेरुलिंग, अजिंक्यतारा, ठोसेघर आदी परिसरात जाण्याला पसंती दिली आहे. शहरातील बहुतांश हॉटेलने युगुल बसले की त्यांच्याकडून वेटिंग चार्जेस लावण्यास सुरुवात केल्याने त्यांना हॉटेलमध्ये बसणे अवघड बनले आहे. त्यामुळे भल्या सकाळी किंवा क्लासच्या वेळेत ही जोडपी गाड्यांवरून निसर्गाच्या सानिध्यात जाताना पाहायला मिळते.

कमीत कमी वेळात घर गाठण्याची कसरत
ाहाविद्यालय किंवा क्लासला दांडी मारून ही युगुलं बाहेर फिरायला जातात. याविषयी त्यांच्या काही मित्र-मैत्रिणींना माहिती दिलेली असते. घरून फोन आला तर ती आमच्याबरोबरच आहे, असे सांगितले जाते.

पण क्लासच्या एका तासात परत येण्यासाठी ही युगुलं अजिंक्यतारा परिसराला पसंती देतात. घड्याळ्याच्या काट्यावर परत घाई गडबडीने येताना युगुलांना किरकोळ दुखापतही होते.

कºहाड तालुक्यात शामगाव घाट, सुर्ली घाट आणि आगाशिव डोंगर ही युवक-युवतींची आवडीची ठिकाणी. एरव्ही सर्वजण प्रीतिसंगम बागेत फिरायला जातात; पण महाविद्यालयीन युवक-युवती एकांतासाठी अशा डोंगरातल्या पायवाटा तुडवताना दिसतात. सुर्ली आणि शामगाव घाटात अनेक वळणे व झाडेझुडपे आहेत. युवक आणि युवती रस्त्याकडेला दुचाकी उभी करून या वळणातून आडोसा शोधत दºयांमध्ये जाऊन बसतात. मात्र, रस्त्याकडेला उभी असलेली दुचाकी पाहिली की, लूटमार करणारे त्या युगुलाचा शोध घेत प्रत्येक दरी पालथी घालतात.

कºहाड आणि पाटण तालुक्यांत डोंगरदºयांमध्ये प्रेमीयुगुलांना एकांत मिळतो; पण अशा एकांताच्या ठिकाणी धोकाही तेवढाच असतो. फिरायला येणारे युवक-युवती एकांत शोधत असताना त्यांच्यावर ‘वॉच’ ठेवणाºया वृत्तीही अशा ठिकाणी पाहायला मिळतात. युगुलांना एकांत आणि लूटमार करणाºयांना संधी मिळताच पुढे जे घडते ते भयानकच असते.

मात्र, तक्रार केली तर घरी समजेल, या भीतीने अनेक युवक-युवती झालेली घटना कोणालाही सांगत नाहीत. त्यामुळे पुढच्यास ठेच मागचा शहाणा, असे होत नाही. पोलिस ठाण्यात तक्रारच होत नसल्यामुळे लूटमार करणारे मोकाट राहतात. परिणामी, काही दिवसांनी ते पुन्हा एकदा नवे सावज शोधून लूटमार करून पसार होतात.

 

Web Title:  Laila-Majnu robbery ... Till now, 23 people will be scared of lodging, nine places in Satara area, desert areas:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.