कानकात्रे तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:43+5:302021-03-13T05:10:43+5:30
चौकट कानकात्रे तलावातून पाटावर येणाऱ्या पाण्याखाली सुमारे ५२५ एकर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. या पाटालगत बागायत क्षेत्र नसले तरी ...
चौकट
कानकात्रे तलावातून पाटावर येणाऱ्या पाण्याखाली सुमारे ५२५ एकर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. या पाटालगत बागायत क्षेत्र नसले तरी उन्हाळी हंगामात शंभर एकरच्या आसपास क्षेत्रात उन्हाळी पिके घेतली जातात. त्यांना पाण्याचा फायदा मिळतो. तसेच पाटात पाणी आल्यानंतर सिमेंट बंधारे, विहिरी भरून घेतल्या जातात व कानकात्रे गावासाठी पिण्यास असलेल्या सार्वजनिक विहिरींमध्येही या पाणी सोडण्याचे नियोजन केले जाते. जमिनीत मुरलेल्या पाण्याचा फायदा आणि अनफळे मायणी तसेच पडळ भागातील शेतकऱ्यांना होत असतो.
चौकट
पाटालगत व ओढ्याच्या काठी असलेल्या विहिरी या पाण्याने भरून घेतल्या जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज व पैसे भरून घेण्यात आले आहेत. तलाव्यात पावसाच्या पाण्याशिवाय इतर ठिकाणावरून पाणी सोडण्याची सोय झाल्यास अधिक क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते.
- अनिल सावंत,
सचिव, पाणी वाटप संस्था