साताऱ्यात पर्समधून लाखाचा ऐवज चोरीस, सोन्याच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:53 PM2017-11-06T17:53:16+5:302017-11-06T17:56:47+5:30

सातारा येथील खणआळी परिसरात खरेदीसाठी आल्यानंतर पर्समधून सुमारे एक लाखाचा ऐवज अज्ञाताने चोरून नेला. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ढेब यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दिली. पोलिस उपनिरीक्षक अशोक ससाणे हे तपास करीत आहेत.

Lakhs of purse from Satara include stolen money, jewelery with gold jewelery | साताऱ्यात पर्समधून लाखाचा ऐवज चोरीस, सोन्याच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश

साताऱ्यात पर्समधून लाखाचा ऐवज चोरीस, सोन्याच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश

Next
ठळक मुद्देशाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद गर्दीचा फायदा घेत केली रोकड लंपास

सातारा ,दि.  ०६ : येथील खणआळी परिसरात खरेदीसाठी आल्यानंतर पर्समधून सुमारे एक लाखाचा ऐवज अज्ञाताने चोरून नेला. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी उषा रत्नकांत ढेब (वय ५७, रा. कृष्णानगर, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, रविवारी सायंकाळच्या सुमारास ढेब या खणआळी परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने त्यांच्या पर्समधून सोन्याचे अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र, दीड तोळ्याचा लक्ष्मीहार आणि सहा हजार रुपयांची रोकड लंपास केली.

याची किंमत एक लाख ४ हजार रुपये आहे. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ढेब यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, पोलिस उपनिरीक्षक अशोक ससाणे हे तपास करीत आहेत.
 

Web Title: Lakhs of purse from Satara include stolen money, jewelery with gold jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.