आयकरच्या भितीने समाज माध्यमांवरील ‘लक्ष्मी’दर्शन फोटो गुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 05:58 PM2017-08-01T17:58:23+5:302017-08-01T17:58:23+5:30

सातारा : आयकर विभागाने सोशल मिडियाकडे आपले लक्ष वळविल्याचा धस्का नेजिझन सातारकरांनी घेतला आहे. विविध समारंभातील आपली श्रीमंती आयकर विभागाच्या डोळ्यावर येवु नये म्हणून अनेकांनी हे फोटो अकाऊंटवरून डिलीट केल्याचे दिसत आहे.

'Lakshmi' photo gallery on social media through fear of income tax! | आयकरच्या भितीने समाज माध्यमांवरील ‘लक्ष्मी’दर्शन फोटो गुल्ल!

आयकरच्या भितीने समाज माध्यमांवरील ‘लक्ष्मी’दर्शन फोटो गुल्ल!

Next

सातारा : आयकर विभागाने सोशल मिडियाकडे आपले लक्ष वळविल्याचा धस्का नेजिझन सातारकरांनी घेतला आहे. विविध समारंभातील आपली श्रीमंती आयकर विभागाच्या डोळ्यावर येवु नये म्हणून अनेकांनी हे फोटो अकाऊंटवरून डिलीट केल्याचे दिसत आहे.

श्रीमंत मिरविण्याची हौस नसली तरीही घरगुती कार्यक्रमात अंगाखांद्यावर ‘लक्ष्मी’दर्शन असावे, असा समज आहे. त्यामुळे घरगुती कार्यक्रम, सण, लग्न, वाढदिवस, एकसष्ठी यांसारख्या अनेक कार्यक्रमांमध्ये लॉकरमधील लक्ष्मीचे दर्शन नातलगांना होते.

नेमके हेच हेरून सोशल मिडियावर विविध कारणांनी अपलोड झालेल्या फोटोवर आयकर विभाग लक्ष केंद्रित करणार आहे. याचा धस्का घेत काही सातारकरांनी सोशल मिडियावरील आपले असे काही फोटो पुल बॅक केल्याची चर्चा रंगली होती.

Web Title: 'Lakshmi' photo gallery on social media through fear of income tax!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.