साताऱ्यातील घरफोडीत ६४ हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:02+5:302021-02-10T04:39:02+5:30
सातारा : येथील मंगळवार पेठेतील एका घरातून सोन्याचा लक्ष्मीहार आणि रोकड चोरून नेण्यात आली. या चोरीत एकूण ६४ हजारांचा ...
सातारा : येथील मंगळवार पेठेतील एका घरातून सोन्याचा लक्ष्मीहार आणि रोकड चोरून नेण्यात आली. या चोरीत एकूण ६४ हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, याप्रकरणी सुनंदा बाळकृष्ण खरात (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार अज्ञाताने चाव्यांची अदलाबदल करून व घरातील पत्र्याच्या पेटीचे कुलूप उघडून चोरी केली. यामध्ये सोन्याचा १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार आणि ४ हजारांची रोकड चोरून नेण्यात आली. अज्ञात चोरट्याने सुमारे ६४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार चव्हाण चोरीचा पुढील तपास करत आहेत.
..........................................