यवतेश्वर मंदिराच्या कट्ट्यावरून दागिन्यांची पर्स लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:40+5:302021-06-16T04:49:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: तालुक्यातील यवतेश्वर येथील महादेव मंदिराच्या पोर्चमधील कट्ट्यावरून ५६ हजारांचा ऐवज असलेली पर्स लंपास केल्याप्रकरणी सातारा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा: तालुक्यातील यवतेश्वर येथील महादेव मंदिराच्या पोर्चमधील कट्ट्यावरून ५६ हजारांचा ऐवज असलेली पर्स लंपास केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मंदिराच्या पोर्चमध्येच असा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शिवानी प्रीतम कळसकर (वय २३, रा. राधिका रोड, भोसले मळा, अयोध्यानगरी, सातारा) यांचे ब्युटीपार्लर आहे. दि. १४ जून रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास त्या यवतेश्वर येथे गेल्या होत्या. महादेव मंदिराच्या पोर्चमधील कट्ट्यावरून त्यांची पर्स चोरट्याने लंपास केली. या पर्समध्ये २२ हजार रुपयांचे अर्धा तोळ्याचे मिनीगंठन, ३३ हजार ८०० रुपयांची रोकड आणि २०० रुपयांची पर्स, आधारकार्ड, एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन असा ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी शिवानी कळसकर यांनी दि. १४ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास याबाबतची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक शिखरे करत आहेत.
...........