रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी कोरेगावात उद्या जमीन मोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:43 AM2021-07-14T04:43:59+5:302021-07-14T04:43:59+5:30
पुणे-मिरज रेल्वे मार्गासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जवळपास तीनवेळेस जमिनींचे संपादन झाले आहे. पूर्वी कोळशावर आधारित रेल्वे असताना, त्यानंतर डिझेलवरील आणि ...
पुणे-मिरज रेल्वे मार्गासाठी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जवळपास तीनवेळेस जमिनींचे संपादन झाले आहे. पूर्वी कोळशावर आधारित रेल्वे असताना, त्यानंतर डिझेलवरील आणि आता विद्युतीकरणामध्ये रेल्वे मार्गालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमिनींच्या संपादनास मोठ्याप्रमाणावर विरोध केला आहे. त्यामुळे केवळ कऱ्डाह ते वाठार स्टेशन दरम्यान रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचे काम रखडले आहे.
भीमनगर येथे मंगळवारी (दि. १३) भूमि अभिलेख विभागामार्फत मोजणी केली जाणार आहे. बुधवारी (दि. १४) सकाळी साडेनऊ वाजता कोरेगावात चौकी नावाच्या शिवारातील सर्वे नंबर २४६, २४७, २५०, २६१, २६५, २६८, २७० या ७ जमीन गटामध्ये मोजणी केली जाणार आहे. तशा आशयाच्या नोटीसा भूमि अभिलेख विभागाने महसूल खात्यामार्फत बजावल्या आहेत.
चौकट :
कोरेगावातील शेतकरी आक्रमक
राज्य शासन आणि रेल्वेच्या भूमिकेमुळे शेतकरी प्रचंड तणावात आहेत. अनेकांच्या घरांपासून अवघ्या शंभर फुटांवर रेल्वे मार्ग आला आहे, त्यात काहींच्या जमिनी तर काहींची पूर्ण घरे दुहेरीकरणामध्ये जात आहेत. त्यांनी मोजणी होऊन देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.