धरणाला जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं! धरणग्रस्तांचा आत्मक्लेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 04:08 PM2019-03-18T16:08:21+5:302019-03-18T16:09:52+5:30

दुष्काळी भाग पाण्याखाली येईल, या उद्देशाने धरणे बांधायला कसदार व पाण्याखालच्या जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं!, अशा शब्दांत सोमवारी धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले.

The land was given to the dam, that's what happened to us! Self-assertion of damages | धरणाला जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं! धरणग्रस्तांचा आत्मक्लेश

धरणाला जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं! धरणग्रस्तांचा आत्मक्लेश

googlenewsNext
ठळक मुद्देधरणाला जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं! धरणग्रस्तांचा आत्मक्लेश जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बसलेल्या आंदोलक राहिले उपाशी

सातारा : दुष्काळी भाग पाण्याखाली येईल, या उद्देशाने धरणे बांधायला कसदार व पाण्याखालच्या जमिनी दिल्या, तेच आमचं चुकलं!, अशा शब्दांत सोमवारी धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे गेल्या ३६ दिवसांपासून श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून धरणग्रस्तांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात सहभागी झालेले धरणग्रस्त सोमवारी दिवसभर उपाशी राहिले. आमचे काय चुकले, असा विचारविनिमय सकाळपासूनच धरणग्रस्तांमध्ये सुरु होता. प्रशासनाच्या असहकार्याबद्दल निषेधही व्यक्त केला.

धरणग्रस्तांनी यावेळी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आपले घर- दार, शेतीवाडी, जन्मभूमी पाण्यात बुडवली, आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्न दाखविली. आमच्या त्यागातून दुष्काळी भागाला पाणी मिळेल, या उदात्त हेतूने कसदार जमिनी धरणासाठी दिल्या; परंतु पुनर्वसनाची प्रक्रिया दिवसेंदिवस लांबतच गेली. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी या योजना तयार केल्या नाहीत, त्यामुळे मूळ हेतूनलाच धक्का बसला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.

जास्त पावसाच्या भागातून धरणग्रस्तांचे कमी पावसाच्या भागात पुनर्वसन करण्यात आले; परंतु अद्याप या धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर तयार केले नाही. जिल्हा पुनर्वसन कार्यालयाकडून कुठल्याच प्रश्नांची सोडवणूक होत नाही. यामुळे धरणग्रस्तांच्या मनात चिड आहे. ३६ दिवस सलग आंदोलन करुनही प्रशासन हालत नाही. त्यामुळे धरणग्रस्तांनी आता काय करावे? याबाबत अस्वस्थता पसरली आहे. यावेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, प्रकाश भातुसे, आनंदा सपकाळ, व्यंकटराव पन्हाळकर, शंकरराव चव्हाण, मोहन धनवे यांनी मनोगत व्यक्त केले.

आता आंदोलनाची तीव्रता वाढवणार

आता आंदोलन अधिक तीव्र करुन प्रशासनाला जाग आणण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने धरणग्रस्तांचा अंत पाहू नये, असा इशारा देण्यात आला आहे.
 

Web Title: The land was given to the dam, that's what happened to us! Self-assertion of damages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.