डॉल्बीच्या कंपनांमुळे जमीन हादरत होती !

By admin | Published: September 10, 2014 11:41 PM2014-09-10T23:41:26+5:302014-09-10T23:52:59+5:30

साताऱ्याचे मृत्युतांडव : प्रत्यक्षदर्शी महिलेचा गौप्यस्फोट

The land was shaking due to Dolby's vibrations! | डॉल्बीच्या कंपनांमुळे जमीन हादरत होती !

डॉल्बीच्या कंपनांमुळे जमीन हादरत होती !

Next

सातारा : ‘विसर्जन मिरवणुकीत दणाणणाऱ्या डॉल्बीच्या कंपनांमुळे जमीन हादरत होती आणि त्या हादऱ्यांमुळे छातीत धडकी भरली असतानाच सोमवारी माझ्या डोळ्यांदेखत भिंत कोसळून मृत्युतांडव घडले,’ अशी माहिती घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या माधवी लाड यांनी ‘लोकमत’ला दिली.
आपल्या कुटुंबीयांसमवेत विसर्जन मिरवणूक पाहावयास आलेल्या लाड आयुर्विमा महामंडळात सेवेस असल्यामुळे तिन्ही मृत व्यक्ती त्यांच्या ओळखीच्या होत्या. कुटुंबीयांना भूक लागल्याने त्यांना चंद्रकांत बोले यांचा वडापावचा गाडा आठवला.
तेथेच त्यांना उमाकांत कुलकर्णी आणि गजानन कदम भेटले. त्यांच्यात बोलणे सुरू असतानाच लाड यांच्या डोळ्यांदेखत इमारतीची भिंत कोसळली. ‘दुर्घटना घडल्यानंतरही डॉल्बी सुरू होती. पोलिसांचे बोलणे कार्यकर्त्यांना ऐकू येत नव्हते. अखेर पोलिसांनी ध्वनिक्षेपकावरून दुर्घटनेची माहिती देऊन डॉल्बी बंद करायला सांगितले, तेव्हाच हादरे थांबले,’ अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी) (संबंधित वृत्त २ वर)

सदोष मनुष्यवधाचा
गुन्हा दाखल करा !
डॉल्बी सिस्टिम गणेशोत्सव मंडळांकडून भाड्याने घेतली जात असली, तरी आवाज किती असावा, हे डॉल्बीचालकाच्याच हातात असते. त्यामुळे सोमवारच्या दुर्घटनेस डॉल्बी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित डॉल्बीचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवरांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर केली.
(लोकमत व्यासपीठ : हॅलो पान ३)

Web Title: The land was shaking due to Dolby's vibrations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.