आगाशिवनगर बाजूला आगाशिव डोंगरावर भूस्खलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:41 AM2021-07-27T04:41:15+5:302021-07-27T04:41:15+5:30

लोकवस्तीपासून तीनशे फूटावर डोंगर खचला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण डोंगरावरील झाडांसह संरक्षक भिंतीमुळे सुरक्षा लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : मलकापूर ...

Landslide on Agashiv hill near Agashivanagar | आगाशिवनगर बाजूला आगाशिव डोंगरावर भूस्खलन

आगाशिवनगर बाजूला आगाशिव डोंगरावर भूस्खलन

Next

लोकवस्तीपासून तीनशे फूटावर डोंगर खचला

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

डोंगरावरील झाडांसह संरक्षक भिंतीमुळे सुरक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : मलकापूर शहरालगत आगाशिव डोंगरावर आगाशिवनगर बाजूला डोंगर खचून भूस्खलन झाले आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीपासून तीनशे फुटावर ही घटना घडली आहे. डोंगर खचल्याची बाब सोमवारी सकाळी डोंगरावरती फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आली. डोंगरावर असलेल्या झाडांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोकवस्तीला संरक्षक भिंत असली तरी डोंगराच्या पायथ्याशी वास्तव्य असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आंबेघर, मिरगाव, ढोकावळे, तसेच तळयेसारख्या अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. शेकडोजण ढिगाऱ्याखाली गाडल्याची घटना समोर आली. सुरुवातीला अशा घटना घडलेल्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे यंत्रसामग्री पोहोचू शकली नाही. त्यामुळे केवळ लोकांच्या मदतीने मदतकार्य सुरू होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तीन दिवसांपासून या ठिकाणी मदतकार्य वेगात केले जात आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्यांना काढण्याचे काम सुरू आहे. रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात सुमारे ३९ मृतदेह मातीच्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात यश आले होते, तर इतरांचा शोध सुरू होता. प्रशासनासह राजकीय नेते लोकांना मदत करण्यात व्यस्त असतानाच अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. या घटनामधील बाधितांना मदतकार्य सुरू असतानाच रविवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे आगाशिव डोंगराच्या उत्तर बाजूचा काही भाग खचला. खचलेला भाग झाडाझुडपांसह उताराच्या दिशेने मानवी वस्तीकडे सरकू लागला; परंतु डोंगरावरती असलेली झाडेझुडपे तसेच डोंगर खचलेल्या ठिकाणापासून मानवी वस्तीचे अंतर याचा विचार करता खचलेला भाग मानवी वस्तीपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, आगाशिवनगर डोंगर खचल्याची बाब सोमवारी सकाळी डोंगरावरती फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यांनी डोंगर पायथ्याला असलेल्या लोकांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. अनेकांनी खचलेल्या डोंगराचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले. घडलेली घटना धोकादायक असून मलकापूर नगरपालिकेने बांधलेली संरक्षण भिंत असली तरी डोंगर पायथ्याला राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. डोंगर रांगांच्या परिसरात घडत असलेल्या भूस्खलनाच्या घटना ताज्या असतानाच दाट लोकवस्ती असलेल्या आगाशिवनगरच्या वरती डोंगर खचल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फोटो कॅप्शन

मलकापूर शहरालगत आगाशिव डोंगरावर आगाशिवनगर बाजूला डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीपासून तीनशे फुटावर डोंगर खचून भूस्खलन झाले आहे. (छाया : माणिक डोंगरे)

260721\1814-img-20210726-wa0031.jpg

फोटो कॕप्शन

मलकापूर शहरालगत आगाशिव डोंगरावर आगाशिवनगर बाजूला डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लोकवस्तीपासून तीनशे फूटावर डोंगर खचून भूस्खलन झाले आहे. (छाया- माणिक डोंगरे)

Web Title: Landslide on Agashiv hill near Agashivanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.