किल्ले प्रतापगड-कुंभरोशीजवळ घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 06:56 PM2022-07-06T18:56:44+5:302022-07-06T18:57:33+5:30

अफझल खानाच्या कबरीजवळ असणाऱ्या वळणावर दरड कोसळली

landslide collapsed in the ghat near Fort Pratapgad Kumbharoshi, one-way traffic resumed | किल्ले प्रतापगड-कुंभरोशीजवळ घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू

छाया : अजित जाधव

googlenewsNext

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या पाच दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून, बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ९२०.४० मिलिमीटर म्हणजेच ३६ इंच पावसाची नोंद झाली, तर २४ तासांत २१३ मिलिमीटर (८ इंच) पावसाची नोंद करण्यात आली. पावसाची संततधार सुरूच असल्याने प्रतापगडावर जाणाऱ्या रस्त्यावर अफझल खानाच्या कबरीजवळ असणाऱ्या वळणावर दरड कोसळली. दरम्यान, बांधकाम विभागाच्या वतीने एका तासात दरड व माती बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू केली.

महाबळेश्वर तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे तालुक्यात काही ठिकाणी दरडी कोसळल्याचे वृत्त आहे. बुधवारी सकाळी कुंभरोशी ते किल्ले प्रतापगड या मार्गावर दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दाखवत रस्त्यावरील दरड हटवून या भागातील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या घटनेचा अंबनेळी घाटातील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही.

कुंभरोशी ते किल्ले प्रतापगड या रस्त्यावर बुधवारी सकाळी मोठी दरड कोसळली, ही दरड इतकी मोठी होती की, या दरडीबरोबर डोंगर उतारावर असलेले मोठमोठे वृक्ष रस्त्यावर येऊन उभे राहिले. यामुळे कुंभरोशी ते किल्ले प्रतापगड चार किलोमीटर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. किल्ले प्रतापगड पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या वाहनांना दोन्ही बाजूला थांबावे लागले.

नदी, नाले, ओढ्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ

अंबेनळी घाटातील दरड कोसळण्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. महाबळेश्वरमध्ये २४ तासांत २१३ मिलिमीटर म्हणजेच तब्बल आठ इंच पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी, नाले, ओढ्यांमधील पाण्याची पातळी वाढली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू केली. दोन्ही बाजूला थांबलेल्या वाहनांचा मार्ग मोकळा करून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान, वाहतूक पूर्ववत झाली तरी दरड काढण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. -महेश गोंजारी, उपविभागीय अभियंता, महाबळेश्वर

Web Title: landslide collapsed in the ghat near Fort Pratapgad Kumbharoshi, one-way traffic resumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.