यवतेश्वर -कास रस्त्यावर दरड कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 03:34 PM2019-06-30T15:34:01+5:302019-06-30T15:36:33+5:30
सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ कास मार्गावर गेल्या पाच सहा दिवसांपासुन मुसळधार पावसामुळे यवतेश्वर घाटात दरड कोसळली.
सातारा - सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसा स्थळ कास मार्गावर गेल्या पाच सहा दिवसांपासुन मुसळधार पावसामुळे यवतेश्वर घाटात दरड कोसळली. आत्तापर्यंत या घाटात दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे.
काही महिन्यांतच कास पठारावरील विविधरंगी फुलांचा हंगाम सुरू होताच राज्य तसेच देश विदेशातून पर्यटकांना कास पठाराचे वेध लागतात. दरडी कोसळत असल्याने रात्री तसेच धुक्यातून वाहनचालकांना वाहने चालविताना अडचणी निर्माण होत आहेत.
दरडी कोसळण्याचे सत्र सुरूच!
एकीकडे संरक्षक कठडे गायब तर दुसरीकडे दरडी कोसळण्याचे सत्र सुरू असल्याने यवतेश्वर घाटातील प्रवास धोकादायक बनू लागला आहे. तसेच दरडी कोसळण्याची शक्यता अधिक असल्याने घाटात वाहने थांबवून फोटोसेशन तसेच सेल्फी काढणे धोकादायक आहे. एखादी विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी पर्यटक, वाहनचालकांकडून होत आहे.