अवकाळी पावसाचे ४ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 05:12 AM2018-04-09T05:12:38+5:302018-04-09T05:12:38+5:30
सातारा, जावळी तालुक्यांना रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. या वेळी जावळी तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळून दोघे ठार झाले.
सातारा : सातारा, जावळी तालुक्यांना रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले. या वेळी जावळी तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळून दोघे ठार झाले. आदिनाथ दिनकर मोरे (३२, सोनगाव) व गणपत धनाजी नारकर (३८ रा. मंगळवार पेठ) अशी मृतांची नावे आहेत.
सोनगाव येथील नागझरी शिवारात शेतात कडबा भरत असताना आदिनाथ यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच केळघरहून साताऱ्याकडे दुचाकीवरून येते असलेले गणपत रस्त्याच्या कडेला थांबले होते. बुलडाणा जिल्ह्यात घाटावरील तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून अधून-मधून वादळी वाºयासह पाऊस होत आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी चिखली तालुक्यातील बोरगाव वसू परिसरात वीज पडून रामेश्वर प्रल्हाद सपकाळ (४५) हे ठार झाल्याची घटना घडली.
सोलापूर जिल्ह्यात शनिवारी रात्री अवकाळी पाऊस झाला. वीज पडून चिखलठाण येथे कोटलिंग यात्रेसाठी नाशिक जिल्ह्यातून आलेल्या लताबाई ठाकरे (२५) यांचे निधन झाले.
विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारा व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़