दोस्तीमुळे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य...

By admin | Published: July 6, 2017 01:08 PM2017-07-06T13:08:54+5:302017-07-06T13:08:54+5:30

डिस्कळ येथे उपक्रम : आपलं नातं आपुलकीचं ब्रिदवाक्याला अनुसरून ग्रुपचे काम

Laughing at the face of poor, growing students due to friendship ... | दोस्तीमुळे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य...

दोस्तीमुळे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य...

Next


आॅनलाईन लोकमत


बुध (जि. सातारा), दि. ५ : डिस्कळ, ता. खटाव येथील दोस्ती ग्रुप म्हणजेच दोस्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ. हे मंडळ नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते. आपलं नातं मैत्रीचं, आपुलकीचं अन सामाजिक बांधीलकीचं या ब्रीद वाक्याला नेहमीच अनुसरून ग्रुपने अनेक कामे आत्तापर्यंत डिस्कळ पंचक्रोशीमध्ये केलेली आहेत. नुकतेच या ग्रुपने डिस्कळमध्ये गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

सध्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. विद्याथीर्ही वेळेवर शाळेत जाऊ लागले आहेत. शाळेकरीता कोणी नवीन सॅक घेतलीय, तर कोणी पावसाळ्याकरीता जर्कीन व रेनकोट तर कोणी रंगीबेरंगी छत्री घेतली आहे. हे सर्व ज्यांची परिस्थिती चांगली आहे अशा पालकांनी आपल्या पाल्यासाठी नक्कीच खरेदी केली आहे. पण ज्यांच्या रोजच्या रोजी रोटीचा प्रश्न असतो. ते पालक कसे काय या सर्व गोष्टी खरेदी करू शकणार? ते तर आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक गरजाही व्यवस्थित पूर्ण करू शकत नाहीत. तर अशा हौस, मौजेच्या गोष्टी तर दूरच राहातात. म्हणून त्यांची मुले अभ्यासात कुठे कमी आहेत का? नक्कीच नाही. उलट त्यांची मुले ही शाळेत जिद्दीने व मेहनतीने पुढे जात असतात. परंतू त्यांना काही मूलभूत गोष्टींची कमी ही भासतच राहते.

याच गोष्टीचा विचार करून दोस्ती ग्रुपने शालेय गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वह्यारुपी मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार डिस्कळ येथील श्री. शिवाजी विद्यालयातील ५ वी ते ७ वीमधील प्रत्येक वगार्तील ५ मुली व ५ मुले याप्रमाणे ६० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्या देण्यात आल्या.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील १ ली ते ४ थी मधीलही प्रत्येक वगार्तील ५ मुली व ५ मुले याप्रमाणे ४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ वह्यांचे वाटप दोस्ती ग्रुपच्या सदस्यांच्या तसेच शाळेतील सर्व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर अक्षदा गणपतराव काटकर हिचा पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास दोस्ती ग्रुपचे सर्व पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्या किर्ती सूर्यवंशी, दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार...


दोस्ती ग्रुपने केलेल्या मदतीचा लाभ १०० शालेय विद्यार्थ्यांना झाला असून, याचा त्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. त्यांना यानिमित्ताने अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे हे विद्यार्थी नक्कीच यशाच्या शिखरापर्यंत जातील हीच अपेक्षा व्यक्त होत होती.

Web Title: Laughing at the face of poor, growing students due to friendship ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.