वाईत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:39 AM2021-03-31T04:39:17+5:302021-03-31T04:39:17+5:30
वाई : पंचायत समितीत राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पौष्टिक तृणधान्य प्रचार अभियानास सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, सदस्य ...
वाई : पंचायत समितीत राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पौष्टिक तृणधान्य प्रचार अभियानास सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, सदस्य मधुकर भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश राठोड, राजेंद्र डोईफोडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
अन्नधान्य पिके पौष्टिक तृणधान्य योजना २०२०-२१ अंतर्गत रोड शो कार्यक्रम आयोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, अन्नधान्य पिके पौष्टिक तृणधान्य योजनेंतर्गत प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी रोड शो कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वाई तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचार रथ फिरणार असल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली.
यावेळी सभापती संगीता चव्हाण यांच्या हस्ते पौष्टिक तृणधान्य माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानांतर्गत वाई येथील शेतकरी गटांना प्रातिनिधिक स्वरूपात विक्री किटचे वाटप करण्यात आले.
सभापती संगीता चव्हाण यांच्या हस्ते जनजागृती रथास हिरवा झेंडा दाखवून रोड शोची सुरुवात करण्यात आली. शोचा पंचायत समिती वाई, बावधन चौक, सह्याद्रीनगर, आसले, पाचवड, भुईंज, जोशी विहीर, सुरूर, ओझर्डे, शहाबाग, परखंदी, मेणवली, धोम, पसरणी, वाई असा फिरणार आहे. वाई तालुक्यातील वाई, भुईंज आणि मेणवली या तीनही कृषी मंडळातील गावांमधून जनजागृती रथाचे मार्गक्रमण होत आहे. कृषी अधिकारी राजेंद्र देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश राठोड यांनी आभार मानले.