कऱ्हाडात ‘व्हॅक्सिन ऑन व्हील’ला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:07+5:302021-07-17T04:29:07+5:30

कऱ्हाड : जिल्हा आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या ‘व्हॅक्सिन ऑन व्हील’ उपक्रमांतर्गत दोन लसीकरण व्हॅन कऱ्हाड शहर व तालुक्यासाठी ...

Launch of ‘Vaccine on Wheels’ in Karachi | कऱ्हाडात ‘व्हॅक्सिन ऑन व्हील’ला प्रारंभ

कऱ्हाडात ‘व्हॅक्सिन ऑन व्हील’ला प्रारंभ

Next

कऱ्हाड : जिल्हा आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या ‘व्हॅक्सिन ऑन व्हील’ उपक्रमांतर्गत दोन लसीकरण व्हॅन कऱ्हाड शहर व तालुक्यासाठी दाखल झाल्या असून, लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबू, आदी उपस्थित होते. शहरातील बुधवार पेठ व तालुक्यातील कोळे येथे लसीकरण सुरू करण्यात आले. यासाठी ३ हजार ६४० डोस उपलब्ध करण्यात आले आहेत.

शहरासह ग्रामीण भागात ज्यांच्याकडे ओळखीचा पुरावा नाही असे व दुर्गम, वाड्या-वस्तीसह वंचित, वीटभट्टी कामगार, भंगार गोळा करणारे, झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी ‘व्हॅक्सिन ऑन व्हील’ या उपक्रमातून लसीकरण करण्यात येणार आहे. याचा लाभ संबंधित घटकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले.

लसीकरणासाठी प्राप्त झालेल्या दोन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गावापासून दूर असलेल्या तसेच दुर्गम भागातील वाडी-वस्तीवर ही रुग्णवाहिका जाणार असून, तेथील ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना दिशानिर्देश देण्यात आले आहेत.

शहरातील नागरी आरोग्य केंद्राच्या मदतीने बुधवार पेठेसह झोपडपट्टीतील नागरिकांचे तसेच कोळे येथे रस्त्याकडेला वास्तव्याला असणाऱ्या भंगार गोळा करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेत एखाद्याकडे ओळखीचा कोणताही पुरावा नसला तरी त्याचे लसीकरण करण्यात येत आहे. कोळे येथे एकाच ठिकाणी सुमारे शंभरजण वास्तव्याला असल्याने याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने लसीकरण करण्यात आले. जिल्हा समन्वयक इरशाद तांबोळी यांच्यासह डॉ. वीना काकडे, डॉ. मेघा अनुगडे, डॉ. खबाले यांच्यासमवेत पारिचारिका, आरोग्यसेविका व मदतनीस या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.

फोटो : १६ केआरडी ०१

कॅप्शन : कऱ्हाडात लसीकरण व्हॅनच्या माध्यमातून वंचित घटकातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

Web Title: Launch of ‘Vaccine on Wheels’ in Karachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.