साताऱ्यात जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गळती

By सचिन काकडे | Published: August 21, 2023 01:33 PM2023-08-21T13:33:21+5:302023-08-21T13:33:37+5:30

गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर

Leakage in water channel of Jeevan Authority in Satara | साताऱ्यात जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गळती

साताऱ्यात जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला गळती

googlenewsNext

सातारा : सातारा शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या जलवाहिनीला शाहू स्टेडियमजवळ मोठी गळती लागली. पाण्याचा अपव्यव सुरू झाल्याने सोमवारी सकाळपासूनच गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

सातारा शहराच्या पश्चिम भागाला नगरपालिका तर पूर्व भागाला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. शाहू स्टेडियम जवळ जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे करंजे, गेंडामाळ या भागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने जीवन प्राधिकरणची यंत्रणा सोमवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाली.

गळती लागलेल्या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने खोदकाम करण्यात आले. यानंतर गळती काढण्याचे काम सुरू झाले. काम पूर्णत्वास येताच या भागाचा पाणीपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती जीवन प्राधिकरणकडून देण्यात आली.

Web Title: Leakage in water channel of Jeevan Authority in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.