साताऱ्यात ऑक्सिजनच्या टँकरला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 01:15 PM2021-05-06T13:15:18+5:302021-05-06T13:17:03+5:30

Accident Satara : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाटानाजिक ऑक्सिजन टँकरला गळती लागल्याने खळबळ उडाली. ऑक्सिजन धूराप्रमाणे रस्त्यावर पसरल्याने महामार्गावर थरार उडाला. सुमारे एका तासानंतर ऑक्सीजनची गळती आटोक्यात आणण्यात यश आले.

Leakage of oxygen tanker in Satara | साताऱ्यात ऑक्सिजनच्या टँकरला गळती

साताऱ्यात ऑक्सिजनच्या टँकरला गळती

googlenewsNext
ठळक मुद्देसाताऱ्यात ऑक्सिजनच्या टँकरला गळती महामार्गावर थरार; ५९ किलो ऑक्सिजन वाया

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाटानाजिक ऑक्सिजन टँकरला गळती लागल्याने खळबळ उडाली. ऑक्सिजन धूराप्रमाणे रस्त्यावर पसरल्याने महामार्गावर थरार उडाला. सुमारे एका तासानंतर ऑक्सीजनची गळती आटोक्यात आणण्यात यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी, पुण्याहून कोल्हापूरकडे बुधवारी सांयकाळी ऑक्सिजनचा टँकर निघाला होता. सांयकाळी सहा वाजता वाढे फाट्याच्या अलीकडे हॉटेलनजीक अचानक टँकरमधून धूर येऊ लागला. टँकर चालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तो घाबरला व टँकर बाजूला घेतला. चालकाने तत्काळ खाली उतरुन पाहिले असता टँकरच्या पाठीमागून ऑक्सिजन गळती होत असल्याचे स्पष्ट झाले

. टँकरवरील चालकाने या घटनेची माहिती त्याच्या अधिकार्‍यांना दिली. ऑक्सिजन लिकबाबत त्यातील तज्ञाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सातारा पोलिसांनीही घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. महामार्गावर येणारी वाहने दूर अंतरावर थांबवण्यात आली.

ओव्हर फ्लोमुळे ऑक्सिजनची गळती झाल्याचे पोलिसांनी सांगितले. टँकरमधील सुमारे ५९ किलो ऑक्सिजन वाया गेला. मात्र त्यानंतर ऑक्सिजनची गळती थांबवण्यात यश आले.

Web Title: Leakage of oxygen tanker in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.