साताऱ्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

By सचिन काकडे | Published: August 16, 2023 04:01 PM2023-08-16T16:01:52+5:302023-08-16T16:36:18+5:30

जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याची आवक कमी

Leakage to the aqueduct, Satara water supply disrupted during rains | साताऱ्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

साताऱ्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई, दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

googlenewsNext

सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सातत्याने गळती लागत असून, याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होऊ लागला आहे. बुधवारी सकाळी शहरातील डोंगरी भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना ऐन पावसात टंचाईचा सामना करावा लागला.

कास योजनेच्या जलवाहिनीला आटाळी व कासाणी गावाजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या गळतीमुळे सांबरवाडी जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली असून, पाणीवितरण व्यवस्थेचा महत्वाचा दुवा असलेल्या पाण्याच्या टाक्या देखील पूर्ण क्षमतेने भरल्या जात नाहीत. परिणामी शहराच्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे तर काही ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्ण विस्कळीत झाला आहे.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून गळती काढण्याचे काम गुरुवारी (दि. १७) हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी १० ते १२ तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे गुरुवारी कास माध्यमातील पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजीनगर, कांबळे वस्ती, जांभळे वाडा या भागासह कात्रेवाडा टाकीतून होणारा सायंकाळ सत्रातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

शुक्रवारी (दि. १८) सकाळ सत्रातील पॉवर हाऊस येथून यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ तसेच कात्रेवाडा टाकी, कोटेश्वर टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी व कोटेश्वर टाकीतून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शनिवार (दि. १९) व रविवारी (दि. २०) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी बापट यांनी केले आहे.

Web Title: Leakage to the aqueduct, Satara water supply disrupted during rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.