कठड्यावर सोडाच पण आता रस्त्यावरसुद्धा भरवसा न्हाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:23 PM2017-10-03T14:23:39+5:302017-10-03T14:27:52+5:30

कास मार्गावरील यवतेश्वर घाटात आजवर दरड कोसळत होत्या. तसेच संरक्षक कठडेही अधूनमधून पडत त्यामुळे होते, पर्यटक काळजी घेऊनच प्रवास करत. पण आता तर रस्त्यावर पण भरवसा राहिला नाही. सोमवारी रस्ता खचल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. 

Leave on the rocks but now it is trusting on the road! | कठड्यावर सोडाच पण आता रस्त्यावरसुद्धा भरवसा न्हाय!

सातारा-कास मार्गावरील रस्ता खचल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे.

Next
ठळक मुद्देसातारा-कास रस्त्यावर वाहन चालकांचा जीव मुठीत धरून प्रवासएकेरी मार्गावरही प्रवासी पायी चालूनच करताहेत प्रवास

पेट्री, दि. ३  : कास मार्गावरील यवतेश्वर घाटात आजवर दरड कोसळत होत्या. तसेच संरक्षक कठडेही अधूनमधून पडत त्यामुळे होते, पर्यटक काळजी घेऊनच प्रवास करत. पण आता तर रस्त्यावर पण भरवसा राहिला नाही. सोमवारी रस्ता खचल्याने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. 


सातारा-कास रस्त्यावर साताºयापासून चार किलोमीटर अंतर असणाºया यवतेश्वर घाटात तब्बल चाळीस मीटर लांब व पाच मीटर रुंदीचा रस्ता मधोमध खचला. खोल दरी तयार झाल्याने पर्यटक, वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. 

पावसाळ्यात दरड कोसळणे, संरक्षक कठडे ढासळणे ही नित्याचीच बाब बनली आहे. या घटनांची यवतेश्वर घाटाबरोबरच नेहमीचे प्रवासी, वाहन चालक व पर्यटकांना सवयच झाली आहे. परंतु, अकस्मात मधोमध रस्ता खचून कोसळणे ही घटना पाहून  पर्यटक, वाहनचालक आवाकच झाले. या घटनेमुळे अनेकांना महाड दुर्घटनेची आठवण झाली. फरक एवढाच तो पूल होता. अन् हा पर्यटकांच्या रहदारीचा मुख्य मार्ग.

कास पठारावर फुलांचा हंगाम जोरात सुरू असून, पिवळ्या रंगाचे मिकी माऊस फुलांचे गालिचे दर्शन देऊ लागले आहेत. ऐन फुलांच्या हंगामात अशी घटना घडल्याने पठारावर जाण्याची वाट बिकट वाटू लागली आहे. पंधरा दिवसांनंतर हंगाम संपू शकतो. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. या घटनेने पर्यटकांचा ओघ ओसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.


पोलिसांची रात्रगस्त

रात्री-अपरात्री आलेल्या प्रवाशांना खड्ड्याचा अंदाज यावा. अपघात घडू नये, यासाठी दोन पोलिस रात्री उशिरापर्यंत खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी बसून होते. 



 

Web Title: Leave on the rocks but now it is trusting on the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.