लोणंद नगरपंचायतीच्या १७ प्रभागांची सोडत जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:37 AM2021-02-12T04:37:54+5:302021-02-12T04:37:54+5:30

लोणंद: नगरपंचायतीच्या १७ प्रभागांची सोडत पद्धतीने आरक्षण बुधवार, दि. १० रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात काढण्यात आले. यामध्ये १७ पैकी १२ ...

Leaving of 17 wards of Lonand Nagar Panchayat announced | लोणंद नगरपंचायतीच्या १७ प्रभागांची सोडत जाहीर

लोणंद नगरपंचायतीच्या १७ प्रभागांची सोडत जाहीर

Next

लोणंद: नगरपंचायतीच्या १७ प्रभागांची सोडत पद्धतीने आरक्षण बुधवार, दि. १० रोजी नगरपंचायतीच्या सभागृहात काढण्यात आले. यामध्ये १७ पैकी १२ जागा आरक्षित झाल्या असून, नऊ जागांवर महिलांचा समावेश असणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी प्रभागांचे आरक्षण जाहीर केले.

प्रभाग व प्रभागनिहाय आरक्षण प्रभाग क्रमांक १ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ) पाटील वस्ती, आदर्श नगर भिसे वस्ती . गणेश नगर बेलाचा मळा, शिंदे, बुणगे, नेवसे वस्ती, बेलाचा मळा प्रभाग क्रं. २ ( नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव ) पंजाब कॉलनी, झारेकरी परिसर, अहिल्यादेवी स्मारक उत्तर बाजू, सूर्या हॉस्पिटल.

प्रभाग क्रमांक ३ ( अनुसूचित जाती महिला राखीव) मोरया नगर, एमएसईबी कॉलनी, बिरोबा कॉलनी काळवट मळा. प्रभाग क्र. ४ ( सर्वसाधारण खुला) इंदिरानगर पूर्व भाग, बाळासाहेब नगर ते सरहद्द ओढा. प्रभाग क्रमांक ५ ( सर्वसाधारण खुला) नगरपंचायत कार्यालय ते डॉ. अडसूळ, समाज मंदिर, मराठी शाळा, स्टेशन चौक, रावळ इमारत ते एसटी स्टँड, जुना फलटण रोड ते रेल्वे पूल, हिरालाल मिस्त्री सुतार. प्रभाग क्र. ६ (नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव ) श्रीराम बाजार ते कापसे ढाबा प्रभाग क्रमांक ७ (अनुसूचित जातीसाठी राखीव) चोपन वस्ती, भुंगे मळा, सावित्री हॉस्पिटल, जुनी पोलीस लाईन प्रभाग क्रमांक ८ (अनुसूचित जमातीसाठी महिला राखीव) बिरोबा वस्ती, खंडाळा नाका, शेळके वस्ती, दगड वस्ती प्रभाग क्रमांक ९ (सर्वसाधारण खुला) भाऊ कुदळे ते विठ्ठल मंदिर ते तानाजी चौक ते गांधी चौक, परदेशी नारळवाले ते बाजारतळ ते भवानी माता

मंदिर ते बाळू क्षीरसागर घर.

प्रभाग क्रमांक १० ( सर्वसाधारण महिलांसाठी राखीव) जंगम घर ते संतोष राऊत ते बबलू घोलप, महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर, गणेश मंदिर, साई मंदिर, गौरी मॉल, राजू नाळे, अशोक शहा घर प्रभाग क्रमांक ११ ( सर्वसाधारण खुला ) पोलीस लाईन, भंडलकर वस्ती, बँक कॉलनी, मार्केट यार्ड, रेल्वे पोर्टर चाळ, कमाने घर ते प्रवीण रावळ घर प्रभाग क्रमांक १२ ( सर्वसाधारण माहिला) बारटक्के घर कोपरा, महावीर दोशी शिवाजी चौक वैजनाथ गाडे भंडारी बोळ पूर्व भाग प्रभाग क्रमांक १३ ( सर्वसाधारण महिलांसाठी राखीव) स्वामी समर्थ मंदिर, बाजारतळ, पंच महाजन वाडा, हेमंत दोशी, घाडगे कॉलनी, जाडकर, दत्तात्रेय वाईकर घर, भोरी ते रवींद्र सोनवले घर प्रभाग क्रमांक १४ ( सर्वसाधारण महिलांसाठी राखीव) कुमार गॅस लक्ष्मण बुवा शेळके घर रामकृष्ण आमटे घर दुर्गा माता मंदिर ते लाखे घर प्रभाग क्रमांक १५ ( नागरिकांचा मागासप्रवर्ग राखीव) शास्त्री चौक पूर्वभाग डोंबार वाडा वडार वाडा ते शंकरराव धायगुडे घर सलीम इनामदार ते भांड गोळे ते चौरे तापडिया घर प्रभाग क्रमांक १६ ( नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला राखीव) सईबाई सोसायटी, महेंद्र दोषी ते घर असा इमारत, गोठे माळ पाणी टाकी प्रभाग क्रमांक १७ (सर्वसाधारण खुला) खोत मळा, जांभळीचा मळा, माउली नगर, सावित्री नगर, सुंदर नगर, ठोंबरे मळा, कुरण वस्ती असा परिसर येतो. दि. १५ रोजी प्रभाग रचनेचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार असून १५ ते २२ फेब्रुवारीपर्यंत दुपारी ३ पर्यंत सूचना व हरकती घेता येणार असल्याची माहिती लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी दिली.

चौकट...

प्रभाग ९ मध्ये महिला राखीव

एकूण १७ प्रभागांपैकी प्रभाग क्रं .३ व ७ हे दोन प्रभाग अनुसूचित जातींसाठी असून यामध्ये अनुसूचित जमातीसाठी प्रभाग ८ महिलांसाठी राखीव झाला आहे. प्रभाग क्रं. ४, ५, ९, ११, १७ सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी असून नऊ प्रभागांमध्ये महिला राखीव असल्याने यावेळीही लोणंद नगरपंचायतीवर महिलाराज येणार आहे.

Web Title: Leaving of 17 wards of Lonand Nagar Panchayat announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.