माणमध्ये ९५ ग्रामपंचायतींची सोडत पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:05 AM2021-02-05T09:05:29+5:302021-02-05T09:05:29+5:30

दहिवडी : माण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींची सोडत शुक्रवारी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने यांच्या उपस्थितीत पार पडली. सरपंचपद ...

Leaving 95 Gram Panchayats completed in Man | माणमध्ये ९५ ग्रामपंचायतींची सोडत पूर्ण

माणमध्ये ९५ ग्रामपंचायतींची सोडत पूर्ण

Next

दहिवडी : माण तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींची सोडत शुक्रवारी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार बाई माने यांच्या उपस्थितीत पार पडली. सरपंचपद आरक्षित झालेल्या काही ठिकाणी त्या वर्गातील सदस्यच निवडून न आल्याने सरपंच पद रिक्त राहणार की आरक्षण बदलले जाणार याबाबत तालुक्यात चर्चा रंगू लागली आहे.

दहिवडीत झालेल्या सोडतीत सर्वसाधारण प्रवर्गाच्या ५७ जागांपैकी महिलांसाठी २९ व पुरुषांसाठी २८ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण कारखेल, वाकी, देवापूर, येळेवाडी, संभुखेड, वडगाव, उकिर्डे, तोंडले, काळेवाडी, जाशी, मोही, बनगरवाडी, ढाकणी, पानवण, कुळकजाई, पिंगळी खुर्द, वाघमोडेवाडी, आंधळी, गोंदवले बुद्रुक, पाचवड, दिवडी, लोधवडे, शिरताव, चिलारवाडी, कुकुडवाड, टाकेवाडी, खुटबाव व बिदाल. सर्वसाधारण महिला प्रवर्ग २९ जागा मिळाल्या. यामध्ये थदाळे, डंगिरेवाडी, वावरहिरे, दानवलेवाडी, विरळी, गटेवाडी, मनकर्णवाडी, अनभुलेवाडी, हिंगणी, धुळदेव, पांगरी, शेवरी, हवालदारवाडी, पळसावडे, शिंगणापूर, शिंदी बुद्रुक, सुरुपखानवाडी, गंगोती, शेनवडी, दिवड, महाबळेश्वरवाडी, कासारवाडी, मलवडी, पिंपरी, काळेवाडी, राजवडी, जाधववाडी, इंजबाव व काळचौंडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग २६ जागा. त्यापैकी पुरुष १३ व महिला १३ जागा. नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला १३ जागा यामध्ये मोगराळे, मार्डी, वडजल, शिंदी खुर्द, वळई, वर-म्हसवड, रांजणी, शिरवली, श्रीपालवण, पुळकोटी, राणंद, वरकुटे मलवडी व पर्यंती. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १३ जागा मिळाल्या. यामध्ये बिजवडी, पुकळेवाडी, किरकसाल, सत्रेवाडी, दिडवाघवाडी, गोंदवले खुर्द, दोरगेवाडी, पळशी, जांभुळणी, नरवणे, तसेच चिठ्ठी काढून भांडवली, भालवडी व सोकासन.

अनुसूचित जाती एकूण बारा जागा त्यापैकी पुरुष सहा व महिला सहा अनुसूचित जाती खुला प्रवर्ग सहा जागा महिमानगड, हस्तनपूर (घेरेवाडी), धामणी, वारुगड, सदस्यच नाही) बोडके, तर चिठ्ठीवर पांढरवाडी आरक्षित करण्यात आले. अनुसूचित महिला प्रवर्ग सहा जागा, पिंगळी बुद्रुक, परकंदी, खडकी, बोथे (सदस्यच नाही), कुरणेवाडी व भाटकी.

Web Title: Leaving 95 Gram Panchayats completed in Man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.