धामणीत बिबट्याचा जनावरांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:43 AM2021-08-13T04:43:54+5:302021-08-13T04:43:54+5:30

भरलोकवस्तीत बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ले सुरू असल्याने धामणीत दहशतीचे वातावरण पसरले आहे. गत महिनाभरातच अनेक शेळ्या व श्वानांचा बिबट्याने ...

Leopard attack on animals in Dhamni | धामणीत बिबट्याचा जनावरांवर हल्ला

धामणीत बिबट्याचा जनावरांवर हल्ला

Next

भरलोकवस्तीत बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ले सुरू असल्याने धामणीत दहशतीचे वातावरण पसरले आहे. गत महिनाभरातच अनेक शेळ्या व श्वानांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. चारच दिवसांपूर्वी कुंभारवाड्यातील घराजवळच्या शेडात घुसून त्याने दोन शेळ्यांना ठार केले. त्यातील एका शेळीला झाडावर फरपटत नेऊन फस्त केले. दोन दिवसांपूर्वी तेथीलच सावंत आळीतील विलास शंकर सावंत यांच्या जनावरांच्या शेडात घुसलेल्या बिबट्याने रेडकावर हल्ला चढवत त्याला ठार केले. नंतर काही अंतरावरच असलेल्या टेकाडावर त्याला फरपटत नेले. सकाळी सुशीला सावंत जनावरांच्या शेडकडे गेल्यावर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. ग्रामस्थांना याबाबत समजल्यावर त्यांनी त्या परिसरात शोधमोहीम राबविली.

घटनास्थळापासून काही अंतरावरच अर्धवट खाल्लेले रेडकू आढळून आले. वन विभागाला याबाबतची माहिती दिल्यानंतर वनपाल सुभाष राऊत, वनरक्षक विशाल डुबल, मुबारक मुल्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. महिनाभरात अनेक शेळ्या व श्वानांचा बिबट्याने फडशा पाडल्यामुळे वन विभागाने पिंजरा बसवून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

फोटो : १२केआरडी०१

कॅप्शन : धामणी, ता. पाटण येथे जनावरांवर हल्ला केल्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याचा माग काढला. (छाया : बाळासाहेब रोडे)

Web Title: Leopard attack on animals in Dhamni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.