Satara: घोगाव येथे बिबट्याचा मेंढ्याच्या कळपावर हल्ला, १३ मेंढ्या ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 16:34 IST2024-12-14T16:33:25+5:302024-12-14T16:34:26+5:30
उंडाळे : घोगाव ता. कराड येथील पाटीलमळी शिवारात मध्यरात्री मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून १३ मेंढ्या ठार केल्या. यात मेंढपाळाचे ...

छाया - ज्ञानेश्वर शेवाळे
उंडाळे : घोगाव ता. कराड येथील पाटीलमळी शिवारात मध्यरात्री मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला करून १३ मेंढ्या ठार केल्या. यात मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले.
शेतीसाठी खत व्हावे या दृष्टिने शेतकऱ्यांने आपल्या पाटील मळी शिवारात मेंढ्या बसवल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या अंधारात बिबट्याने कळपावर हल्ला केला. यात १३ मेंढ्या ठार झाल्या.
सदर घटनेचा पंचनामा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. मेंढपाळाला तातडीची मदत व्हावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने घोगाव ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले.