कोयना धरणाशेजारी बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:30+5:302021-07-30T04:40:30+5:30
कोयनानगर : कोयना धरणाच्या स्वागत चौकीच्या समोरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे सिंचन व ...
कोयनानगर : कोयना धरणाच्या स्वागत चौकीच्या समोरील रस्त्यावर गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे सिंचन व पोलीस कर्मचाऱ्यासह नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजता कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग साडेपाच फुटांवरून नऊ फूट करण्यासाठी कोयना सिंचन विभागाचे अधिकारी कर्मचारी व पोलीस निरीक्षक धरणाच्या भिंतीवर गेले होते. पाण्याचा विसर्ग वाढल्यानंतर पोलीस स्टेशनचे वाहन पुढे गेले त्यानंतर काही वेळाने सिंचन विभागाचे कर्मचारी वाहनातून परत कोयनेकडे जात असताना धरणाच्या स्वागत कमानीच्या समोरील रस्त्यावरून बिबट्या चालत जात असल्याचे कर्मचाऱ्यांना दिसला काही क्षणातच वाहनाचा आवाज व माणसाची चाहूल लागताच तो पश्चिमेकडील डोंगराकडे पळून गेला. या स्वागत चौकीत सहा पोलीस कर्मचारी व भिंतीच्या पलीकडील चौकीवर पाच असे अकरा पोलीस कर्मचारी चोवीस तास धरणाच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.
कोयना धरण परिसरात वन्यप्राण्याचा वावर वाढल्याने पोलीस कर्मचारी व प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच कोयना अभयारण्यातील वन्यप्राणी मानवी वस्तीतून फिरत आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चौकट
२५ जून २०१९ रोजी पायथा वीजगृहाशेजारील पोलीस चौकीबाहेर बिबट्या थांबल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला होता. ४ मे २०१८ रोजी कोयना धरणाच्या भीतीवरून बिबट्या चालत गेला होता. तर २९ नोव्हेंबर २०१९ धरणाच्या वक्र दरवाजाशेजारी मोठ्या अजगरास सर्पमित्रांनी पकडले होते.
290721\img-20210729-wa0028.jpg
कोयना धरणाशेजारी बिबट्याचे दर्शन