बिबट्याने खाल्ले पंचवीस लाखांचे प्राणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:09+5:302021-06-11T04:26:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : बिबट्या हा चोरटा शिकारी. कधी तो बेडूक खातो तर कधी खेकडे. काहीही खाऊन तो ...

Leopards ate 25 lakh animals! | बिबट्याने खाल्ले पंचवीस लाखांचे प्राणी!

बिबट्याने खाल्ले पंचवीस लाखांचे प्राणी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : बिबट्या हा चोरटा शिकारी. कधी तो बेडूक खातो तर कधी खेकडे. काहीही खाऊन तो वेळ मारून नेतो; पण ज्यावेळी तो मानवी वस्तीनजीक पोहोचतो, त्यावेळी पाळीव जनावरेच त्याचा घास बनतात. कऱ्हाड तालुक्यात अशी शेकडो जनावरे आजवर बिबट्याने फस्त केली आहेत. त्यापोटी नुकसानभरपाई म्हणून वन विभागाला शेतकऱ्यांना तब्बल पंचवीस लाख रुपये द्यावे लागले आहेत.

जंगलातील अधिवास सोडून बिबट्या शिवारात रमला. गर्द झाडीऐवजी ऊसाचे शेतच अधिवास असल्याचा अनुवांशिक बदल झाल्यामुळे शिवारात बिबट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्याचा हा वावर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे. कऱ्हाडच्या वनक्षेत्रालगत तसेच इतर गावांच्या शिवारातही बिनदिक्कतपणे बिबट्या वावरताना दिसतो. मुळातच हा प्राणी परिस्थितीशी जुळवून घेतो. शिकार मिळाली नाही तरी तो बेडूक, उंदीर, घूस असे लहान-मोठे प्राणी खाऊन जगतो. मात्र, शिवारात वावरताना मानवी वस्तीसह इतर ठिकाणी बांधलेली पाळीव जनावरेही तो फस्त करतो.

मुळातच आपल्यापेक्षा कमी उंचीच्या प्राण्यावर तो हल्ला करतो आणि हा हल्लाही आक्रमक पद्धतीने असतो. त्यामुळे काही मिनिटातच पाळीव जनावरे त्याची शिकार बनतात. ही शिकारही तो त्याच जागेवर थांबून खात नाही. जनावरावर हल्ला केल्यानंतर ते जनावर दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी नेऊन तो त्याचा फडशा पाडतो. काहीवेळा बिबट्याने शिकार झाडावर नेऊन ती फस्त केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. कऱ्हाड तालुक्यात बिबट्याने गत आठ वर्षांमध्ये अशी शेकडो जनावरे फस्त केली असून, त्यापोटी वन विभागाकडून शेतकऱ्यांना २४ लाख २४ हजार ७१२ रुपयांची नुकसानभरपाईही देण्यात आली आहे.

- चौकट

वर्ष : मंजूर प्रकरणे : रक्कम

२०१३-१४ : १६ : ६१८७५

२०१४-१५ : १४ : ५२७५०

२०१५-१६ : ३० : १३२५००

२०१६-१७ : २८ : १५७२७५

२०१७-१८ : ४७ : ४०४९६२

२०१८-१९ : ७६ : ६५८२५०

२०१९-२० : ७२ : ६२७०५०

२०२०-२१ : ६५ : ३३००५०

- चौकट

बिबट्याने केलेली

जनावरांची शिकार

२०१३-१४ : २०

२०१४-१५ : १६

२०१५-१६ : ३४

२०१६-१७ : ४४

२०१७-१८ : ७९

२०१८-१९ : ४४

२०१९-२० : ४८

२०२०-२१ : ४०

एकूण २५३

- चौकट

पूर्ण वाढ झालेला बिबट्या एकावेळी आठ ते दहा किलो वजनाच्या जनावराचा फडशा पाडू शकतो. तसेच एकदा अशी शिकार केली तर तो दोन ते तीस दिवस त्यावर राहू शकतो.

- चौकट

उपाशी बिबट्यांचा धोका अधिक

बिबट्या उपाशी असेल तर तो अधिक हिंस्र बनतो, असे प्राणीतज्ज्ञ सांगतात. भक्ष्याच्या शोधात तो फिरत असतो. मात्र, भक्ष्य नाही मिळाले तर मानवी वस्तीनजीक पाळीव जनावरांवर तो हल्ला चढवतो. दोन ते तीन दिवसात एकदाच तो शिकार करतो, असेही प्राणीतज्ज्ञांचे मत आहे.

- कोट

गत काही वर्षात बिबट्याप्रवण क्षेत्र कमालीचे वाढले आहे. वारंवार हल्लेही होत आहेत. ज्याठिकाणी पूर्वी मागमूस नव्हता, त्याठिकाणीही सध्या बिबट्या दिसतोय. सध्याचे बीटनिहाय बिबट्याप्रवण क्षेत्र पाहिले तर प्रत्येक बीटमध्ये किमान दोन ते तीन बिबटे असावेत.

- रोहन भाटे

मानद वन्यजीव रक्षक, कऱ्हाड

फोटो : १० केआरडी ०१

कॅप्शन : प्रतिकात्मक

लोगो : बिबट्याची वस्ती २

Web Title: Leopards ate 25 lakh animals!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.