Satara: पावसाची उघडीप; चार महिन्यांत नवजाला साडे पाच हजार मिलीमीटर पर्जन्यमान 

By नितीन काळेल | Published: September 29, 2023 06:18 PM2023-09-29T18:18:15+5:302023-09-29T18:20:35+5:30

कोयना धरणातील पाणीसाठा किती..जाणून घ्या

Less rain in Satara district, In four months the rainfall in Navja is as high as five and a half thousand millimeters | Satara: पावसाची उघडीप; चार महिन्यांत नवजाला साडे पाच हजार मिलीमीटर पर्जन्यमान 

Satara: पावसाची उघडीप; चार महिन्यांत नवजाला साडे पाच हजार मिलीमीटर पर्जन्यमान 

googlenewsNext

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असली तरी चार महिन्यात नवजा येथे तब्बल साडे पाच हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान झाले आहे. तर महाबळेश्वरच्या पावसानेही पाच हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. कोयना परिसरात पाऊस कमी असून धरणातील पाणीसाठा ९२ टीएमसीच्यावर गेला आहे.

जिल्ह्यात जूनपासून सप्टेंबरपर्यंतचे चार महिने पावसाळ्याचे समजले जातात. या महिन्यात पडणाऱ्या पावसावरच खरीप आणि रब्बी हंगामाचे गणित अवलंबून असते. तसेच पिण्याचे आणि शेती पाण्याचा प्रश्नही अवलंबून असतो. पण, यावर्षी पावसाने जिल्हावासीयांना दगा दिलेला आहे. यंदा आतापर्यंत तरी अपुरे पर्जन्यमान झालेले आहे. तर मान्सूनचा पाऊसही उशिरा दाखल झाला होता.

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोर धरला. त्यानंतर जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत धो-धो पाऊस कोसळत होता. यामुळे पश्चिम भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. तर अनेक मार्गावर दरडी कोसळल्या होत्या. पण, आॅगस्ट महिन्यात कमी पाऊस झाला. तसेच सप्टेंबर महिन्यात आतापर्यंतरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नाही. त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासण्याची चिन्हे आहेत.

पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी आणि कोयनासारखे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. यातील बलकवडी आणि तारळी ही धरणेच भरल्यात जमा आहेत. तर इतर धरणांत ६० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान पाणीसाठा झालेला आहे. आता पाऊस झाल्यास ही धरणे भरणार आहेत. अन्यथा धरणे भरणे शक्य नाही. त्यातच कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पण, धरण भरण्यासाठी अजून १२ टीएमसीवर पाण्याची गरज आहे. तर उरमोडी धरणातून जिल्ह्याच्या पूर्व भागात सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. सध्या हे धरण ६० टक्केही भरलेले नाही. त्यामुळे अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे.

कोयनेला ३९२८ मिलीमीटर पाऊस..

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान चांगला पाऊस होतो. याकाळात पश्चिमेकडील कोयनानगर, नवजा, तापोळा, महाबळेश्वर या भागात तुफान वृष्टी होते. त्यामुळे येथील पाऊस पाच-सहा हजार मिलीमीटरचा टप्पा पार करतो. या भागात आतापर्यंतच्या चार महिन्यात नवजाला सर्वाधिक ५५५१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यानंतर महाबळेश्वरला ५३४७ मिलीमीटर पाऊस पडला. तर कोयनानगरला कमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ३९२८ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तर कोयना धरणात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील आवक एकदम कमी झाली आहे.

Web Title: Less rain in Satara district, In four months the rainfall in Navja is as high as five and a half thousand millimeters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.