शाळा बंद असतानाही मुलांनी गिरवले व्यवहार ज्ञानाचे धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 05:39 PM2020-12-25T17:39:42+5:302020-12-25T17:41:24+5:30

CoronaVirusUnlock Satara- पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे, अर्थकारण समजावे यासाठी शाळांमधून दरवर्षी भाजीमंडई भरवली जाते. कोरोनाचा शिरकाव झाला अन् मार्चपासून शाळा बंद ठेवाव्या लागल्या. घरात बसून मुलं ऑनलाईन शिक्षण घेत असले तरी त्यांच्यातील शिक्षणाचा आनंद कमी होऊ नये म्हणून वाईतील सोसायटीमध्येच भाजीमंडई भरवण्यात आली होती.

Lessons learned by children even when school is closed! | शाळा बंद असतानाही मुलांनी गिरवले व्यवहार ज्ञानाचे धडे!

वाईतील सोसायटीत मुलांसाठी भाजीमंडई भरविण्यात आली होती. त्यातून त्यांनी व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवले. (छाया : पांडुरंग भिलारे)

Next
ठळक मुद्देशाळा बंद असतानाही मुलांनी गिरवले व्यवहार ज्ञानाचे धडे!सोसायटीत भरवली भाजीमंडई : वाईमध्ये निवृत्त शिक्षकेसह उपशिक्षकेचा उपक्रम

वाई : पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे, अर्थकारण समजावे यासाठी शाळांमधून दरवर्षी भाजीमंडई भरवली जाते. कोरोनाचा शिरकाव झाला अन् मार्चपासून शाळा बंद ठेवाव्या लागल्या. घरात बसून मुलं ऑनलाईन शिक्षण घेत असले तरी त्यांच्यातील शिक्षणाचा आनंद कमी होऊ नये म्हणून वाईतील सोसायटीमध्येच भाजीमंडई भरवण्यात आली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये म्हणून गेली सहा महिन्यांपासून शासनाने शाळकरी मुलांना शाळा बंद ठेवल्या आहेत. बहुतांश शाळा ऑनलाईन धडे देत आहेत. त्याला ही अनेक मुले कंटाळली आहेत. कोरोनाच्या या प्रदीर्घ सुट्टीला कंटाळलेल्या बालचमूमध्ये नवचैतन्याचा झरा निर्माण करणारा भाजी मंडई हा उपक्रम कन्याशाळेच्या माजी उपशिक्षिका रुक्मिणी घोलप, केंजळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका शीला मांढरे यांच्या कल्पकतेतून हा अनोखा उपक्रम सोसायटीमध्येच साकारण्यात आला.

भाजी खरेदीपासून भाजी विक्रीसाठी ठेवणे, भाजीची विक्री करणे या सर्व गोष्टींचे नियोजन बालचमूने शीला मांढरे व रुक्मिणी घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सायंकाळी चार ते सातपर्यंत बालमंडई भरली होती. यावेळी साक्षीपार्क सोसायटीसह आजूबाजूच्या सोसायट्या, रहिवाशांनी खरेदीला गर्दी केली होती.

लहान मुलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास व एक वेगळा आनंद दिसत होता. बालमंडईमध्ये आर्यन पवार, श्रेयश राजपुरे, युवराज राजपुरे, श्रावणी शिंगटे, सिद्धार्थ कुचेकर, समृद्धी कुचेकर, अथर्व घोरपडे, अर्णव ढवळे, सत्यजित सावंत, दुर्वा मोरे, चिनू मोरे, अर्णव ढवळे या बाल विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता. भाजी मंडई सोशल डिस्टंसिंगचे पालन करत पालक ग्राहकांनी भाजी खरेदी केली. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी व त्यांचे कौतुक करण्यासाठी बालचमुना खाऊ वाटप केला.

खऱ्या कमाईचा आनंद

अनेक दिवस शाळा बंद असल्यामुळे न कळत यांचे वाईट परिणाम मुलांवर दिसत आहेत. त्यांना काहीतरी वेगळं शिकण्याचा आनंद मिळावा. उपक्रमामुळे मुलांना भाजीची खरेदी विक्री कशी करायची, आर्थिक व्यवहार कसा करायचा, आकडेमोड कशी करायची याचे व्यवहार ज्ञान मिळाले. तसेच खरी कमाई मिळाल्यामुळे त्यांना जो आनंद मिळाला त्याला तोड नाही, अशा भावना सामाजिक कार्यकत्या रुक्मिणी घोलप यांनी व्यक्त केल्या.

 

Web Title: Lessons learned by children even when school is closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.