विदयार्थ्यांनी घेतले तत्रंज्ञानाचे धडे
By admin | Published: July 15, 2017 01:00 PM2017-07-15T13:00:42+5:302017-07-15T13:00:42+5:30
आसरे येथील विदयालयात विज्ञान वाहिनीची फिरती प्रयोग शाळा
आॅनलाईन लोकमत
वाई (जि. सातारा), दि. १५ : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नरसिंह हायस्कूल धोम पंचक्रोशी कंमडलू माध्यमिक विदयालय आसरे (ता़ वाई ) या माध्यमिक विदयालयात विज्ञान वाहिनी फिरती प्रयोग शाळा पुणे यांच्या वतीने विदयार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्याक्षिकासह विविध विज्ञानाचे प्रयोग करून दाखविण्यात आले़
व्हिडोओ सादरीकरणाच्या माध्यमातून विविध विज्ञानासह आरोग्य, तत्रंज्ञान, पर्यावरणाचे माहितीपट दाखविण्यात आले़ तज्ञ मार्गदर्शकांनी विदयार्थ्यांमध्ये कौशल्य वाढ विषयक मार्गदर्शन केले़
धोम हायस्कूल येथील कार्यक्रम वाई येथील स्वर्गीय दिनेश ओसवाल प्रतिष्ठान वाई व तुतारी मित्र समुह वाई यांच्या अंतर्गत घेण्यात आला़ यावेळी वाईतील सामाजिक कार्यकर्ते पोपटलाल ओसवाल, रमेश भटट्ड, मुख्याध्यापिका कस्तुरी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते़