corona virus-मुलांबरोबरच कल्पकतेला वाव देऊया,अवांतर ज्ञानाबरोबरच कामांमध्येही मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:07 PM2020-03-20T17:07:53+5:302020-03-20T17:10:43+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून घरात कोंडून घातलेल्या मुलांबरोबरच गुगलगिरी करणाऱ्या पालकांच्याही कल्पकतेला वाव देण्याची संधी खऱ्या अर्थाने उपलब्ध झाली आहे. कधी नव्हे ते शाळा आणि क्लासच्या कटकटीतून मुक्त झालेल्या मुलांना संरचनात्मक पध्दतीने घडविण्याचा प्रयत्न या संकटातून बाहेर पडताना पालकांनी करणं गरजेचं आहे.

Let kids have imaginative skills, plus knowledge and help with tasks | corona virus-मुलांबरोबरच कल्पकतेला वाव देऊया,अवांतर ज्ञानाबरोबरच कामांमध्येही मदत

corona virus-मुलांबरोबरच कल्पकतेला वाव देऊया,अवांतर ज्ञानाबरोबरच कामांमध्येही मदत

googlenewsNext
ठळक मुद्देमुलांबरोबरच आपल्यातील कल्पकतेला वाव देऊया,अवांतर ज्ञानाबरोबरच कामांमध्येही मदत  संकटातही संरचनात्मक उत्तर शोधण्याची गरज

प्रगती जाधव-पाटील

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून घरात कोंडून घातलेल्या मुलांबरोबरच गुगलगिरी करणाऱ्या पालकांच्याही कल्पकतेला वाव देण्याची संधी खऱ्या अर्थाने उपलब्ध झाली आहे. कधी नव्हे ते शाळा आणि क्लासच्या कटकटीतून मुक्त झालेल्या मुलांना संरचनात्मक पध्दतीने घडविण्याचा प्रयत्न या संकटातून बाहेर पडताना पालकांनी करणं गरजेचं आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या सेट झालेल्या रूटीनच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका पालकांना बसला आहे. दिवसभर क्लास आणि शाळा अशा व्यस्त दिनचर्येत अडकलेली लेकरं आता मोकाट झाली आहेत. परिक्षेच्या तोंडावर सुट्टी मिळाल्याने त्यांना अभ्यास करण्याची इच्छाच होईना आणि पालकांना नेमकं हेच सोसेना अशी स्थिती घराघरांत दिसत आहे.

विशेष म्हणजे शाळा, क्लास आणि खेळ यात व्यस्त असलेल्या मुली पालकांना सलग आठ ते दहा तास कधी भेटतच नव्हती. आता कुठंही बाहेर जाण्याची सोय नसल्यामुळे लेकरांबरोबर पूर्णवेळ थांबायची वेळ पालकांवर आली आहे. याची सवय नसल्याने घरात वातावरणही तंग होत आहे.

पालकांनी हे करावेच

  • मुलांकडून प्रत्येक विषयाचा दररोज सराव करून घ्या,
  • प्रश्नोत्तरे, प्रश्नपत्रिका सराव, लेखन, वाचन यांचा सराव घ्या.
  • खेळांतून द्या महत्वपूर्ण धडे
  • पालकांनी घरात मुलांबरोबर गॅझेट फ्री वातावरणात राहण्याच प्रयत्न करावा.
  • काचा कवड्यांसारखे अनेक बैठे खेळ मुलांशी संवाद साधत खेळणं हा एक उत्तम पर्याय आहे.
  • याबरोबरच त्यांना नकाशा वाचण्याची, गावाचा इतिहास सांगण्याची, भूगोल दाखविण्यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत.
  • घरातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांची मदत घेवून त्यांच्या सहाकार्याने घर आवरण्याची ही संकल्पना मुलांना स्वयंशिस्तीच्या निकषांवर उपयुक्त ठरतात.


शाळेच्या संपर्काचा पर्याय

फोन, वॉट्सअ‍ॅप, मेसेज या माध्यमातून आपल्या पाल्याच्या शिक्षकांच्या संपर्कात राहा. शाळेला सुट्टी असली तरीही शिक्षकांना आॅनलाईन मार्गदर्शन करण्याचे बंधनकारक आले. यामुळे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, होमवर्क देतील. कोणत्याही कारणांनी मुलांच्या अभ्यासात खंड पडू देऊ नका... आपल्या शंका ,अडचणी नक्की विचारा,

हे टाळा..!
मुलांना अनोळखी व्यक्तींच्या, परदेशी पाहुण्यांच्या संपर्कात जाऊ देऊ नका. बाहेरील वस्तू खाऊ देऊ नका, उघड्यावरील वडापाव, आईस्क्रीम, बर्फ गोळा, आईस कांडी, पाणीपुरी,भेळ अशा वस्तूंपासून चार हात दूर ठेवा. याबरोबरच मुलांना सुट्टी लागली म्हणून गावाला पाठवू नका, त्यांना पिकनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी, पर्यटन स्थळे, सहल इत्यादी ठिकाणी जाणं धोक्याचं ठरू शकतं. सुट्टी आहे म्हणून त्यांना बाजार, यात्रा महोत्सव, आदी ठिकाणी पाठवू नका.

पाळणाघरही बंदच
कोरोनाचा संसर्ग लगेच होत असल्याच्या धास्तीमुळे शहरातील बहुतांश पाळणाघरही बंद ठेवण्यात आली आहेत. काही ठिकाणी पालकच मुलांना पाठवत नाहीत, तर काही पाळणाघर शासनाच्या कारवाईच्या भितीनेच बंद ठेवण्यात आली आहेत.


संकटातून मार्ग शोधण्याची उत्तम संधी पालक म्हणून अनेकांसमोर आली आहे. गुगलगिरी बंद करून विचार करण्याची प्रक्रिया आणि त्यातुन निर्माण होणारी कल्पकता प्रदर्शित करण्यासाठी मिळालेल्या या सुट्टीचा पालकांनी पाल्यासोबत आस्वाद घ्यावा.
- डॉ. राजश्री देशपांडे,
मनोविकारतज्ज्ञ, सातारा


माझ्या दोन्ही मुली आजी-आजोबा आणि अत्या यांच्यासोबत दिवसभर घरीच असतात. रोज टिव्ही किंवा गॅझेट बघण्यापेक्षा मी त्यांच्यासाठी ब्रेन गेम आणल्यात त्यात त्यांचा बराच वेळ जातोय. रात्री घरी परतल्यावर त्यांनी दिवसभर केलेल्या कृतींचा मी आढावा घेते.
- राणी मुथा-शहा,
सीए, सातारा

 

 

Web Title: Let kids have imaginative skills, plus knowledge and help with tasks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.