नियमांचे पालन करुन कोरोनाची साळखी तोडूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:41 AM2021-04-20T04:41:18+5:302021-04-20T04:41:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाची लक्षणे असूनही काही रुग्ण दुर्लक्ष करत आहेत. दुर्लक्षामुळे संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग ...

Let's break the corona chain by following the rules | नियमांचे पालन करुन कोरोनाची साळखी तोडूया

नियमांचे पालन करुन कोरोनाची साळखी तोडूया

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाची लक्षणे असूनही काही रुग्ण दुर्लक्ष करत आहेत. दुर्लक्षामुळे संपूर्ण कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग होत आहे. तसेच रुग्ण उशिरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर उपचार करण्यास अडचणी येत आहेत, त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

शासनाने ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली असून, काही घटकांना मुभा देण्यात आली आहे. संचारबंदी असूनही काहीजण बाहेर फिरत आहेत. नागरिकांनी शासनाने घातलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबर मास्कचा वापर, वेळोवेळी हाताची स्वच्छता व सुरक्षित अंतर राखणे महत्त्वाचे आहे. तसेच ज्या कुटुंबातील व्यक्ती कोरोनाबाधित आहेत, त्या कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. शासनाने व प्रशासनाने घातलेल्या नियमांचे पालन करुन सर्वांनी संघटित होऊन कोरोना संसर्गावर मात करुया, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.

Web Title: Let's break the corona chain by following the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.