माथाडी कामगार चळवळीच्या माध्यमातून घरे उभी करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:04+5:302021-07-30T04:40:04+5:30

वाई : केंद्र शासनाच्या माध्यमातून व माथाडी चळवळीच्या माध्यमातून वाई तालुक्यातील देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्त बांधवांना घरे उभी करण्यासाठी ...

Let's build houses through the Mathadi labor movement | माथाडी कामगार चळवळीच्या माध्यमातून घरे उभी करू

माथाडी कामगार चळवळीच्या माध्यमातून घरे उभी करू

Next

वाई : केंद्र शासनाच्या माध्यमातून व माथाडी चळवळीच्या माध्यमातून वाई तालुक्यातील देवरुखवाडी येथील नुकसानग्रस्त बांधवांना घरे उभी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली.

नरेंद्र पाटील यांनी कोंडावळे येथील देवरूखवाडी या गावाला भेट देऊन येथील नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

नरेंद्र पाटील म्हणाले, देवरूखवाडीबरोबर संपूर्ण कोंडावळे गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी शासन दरबारी करणार आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना येथील नुकसानीची संपूर्ण माहिती दिली जाईल. शासनाने पश्चिम भागातील नुकसानीचे पंचनामे करून सरसकट नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या वेळी कोंडावळे गावचे सरपंच व गावकरी तसेच भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, नवी मुंबईचे नगरसेवक व माथाडी नेते रविकांत पाटील, माजी उपसभापती चंद्रकांत शेलार, राहुल यादव, युवराज कोंढाळकर, स्वप्निल जाधव, सुरेंद्र जाधव, दत्तात्रेय कोंढाळकर, अंकुश कोंडाळकर व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Let's build houses through the Mathadi labor movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.