एप्रिल ‘फूल’ऐवजी एप्रिल ‘कूल’ करू या-सोशल मीडियाच्या माध्यमातून वृक्षलागवडीबाबत प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:40 AM2018-04-01T00:40:20+5:302018-04-01T00:40:20+5:30

 Let's cool April instead of 'flower' - Inspiration for tree plantation through social media | एप्रिल ‘फूल’ऐवजी एप्रिल ‘कूल’ करू या-सोशल मीडियाच्या माध्यमातून वृक्षलागवडीबाबत प्रबोधन

एप्रिल ‘फूल’ऐवजी एप्रिल ‘कूल’ करू या-सोशल मीडियाच्या माध्यमातून वृक्षलागवडीबाबत प्रबोधन

Next
ठळक मुद्देनेटिझन्सची हाक

 सातारा : एकीकडे वाढते तापमान अन् दुसरीकडे दिवसरात्र भडकणाऱ्या वणव्यामुळे डोंगर ओसाड पडू लागले आहे. या वणव्यात हजारो वृक्ष खाक होत असून, पशुपक्ष्यांचा अधिवासही नष्ट होत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता नेटिझन्सनी पुढाकार घेतला आहे. ‘तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षापासून ‘एप्रिल फूल’ऐवजी ‘एप्रिल कूल करू या,’ अशी आर्त हाक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जात आहे.

सध्या सोशल मीडिया हे केवळ संवादाचेच नव्हे तर जनजागृतीचेही प्रभावी माध्यम बनू पाहत आहे. एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असो की आर्थिक मदत असो, सोशल मीडियाच्या माध्यमातून जो तो आपापल्या परीने मदतीसाठी धावून येतो. वाढत्या उष्म्याचा जसा माणसांवर परिणाम होतो तसाच परिणाम पशुपक्ष्यांवरही होतो. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्याने पशुपक्षी कासावीस होतात. त्यामुळे पक्ष्यांसाठी पाणवठे तयारकरण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले.परिणामी अनेकांकडून रस्त्याच्या कडेला, झाडांवर, डोंगरांवर पक्ष्यांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था केलीगेली.

सध्या तापमानवाढ ही समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बेसुमार जंगलतोड आणि
वणव्यामुळे हजारो झाडे जळून खाक होत आहे. ही बाब तापमानवाढीला कारणीभूत ठरत आहे. वाढते
तापमान रोखण्यासाठी आता पुन्हा एकदा नेटिझन्सनी पुढाकार घेतला आहे. तापमानवाढ रोखण्यासाठी
वृक्ष लागवड व संवर्धनाबाबतसोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीपर आवाहन केले जात आहे.
एप्रिल महिन्यात एकमेकांचा एप्रिल फूल करण्याऐवजी प्रत्येकाने एक झाड लावू या आणि पुढील वर्षी एप्रिल फूलऐवजी एप्रिल कूल करू या, अशी आर्त हाक नेटिझन्सकडून दिली जात आहे. विशेष बाब म्हणजे सातारकरांनी या हाकेला प्रतिसाद देत वृक्ष लागवडीसाठी पुढाकारही घेतला आहे.

 

तापमान वाढ आणि वृक्षतोड हे दोन्ही विषय पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे महत्त्व ओळखून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये तापमानवाढ रोखण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. आज खरंच एप्रिल फूलऐवजी एप्रिल कूल करण्याची सर्वाधिक गरज आहे.
- सागर भगत, चिमणगाव

Web Title:  Let's cool April instead of 'flower' - Inspiration for tree plantation through social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.