दुफळी न ठेवता मराठा आरक्षणासाठी लढा उभारुया, गोलमेज परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 01:22 AM2020-11-03T01:22:10+5:302020-11-03T01:22:36+5:30
Maratha reservation : कोडोली येथे विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषद झाली.
सातारा : ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी दुफळी न ठेवता एकजुटीने लढा उभारुया. या लढाईत कोणीही मागे राहू नये, असा निर्धार साताऱ्यातील विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत करण्यात आला. तसेच पुणे विभागीय पदवीधार मतदारसंघ निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार उभा करून विजयी करण्याचेही निश्चित करण्यात आले.
कोडोली येथे विभागीय मराठा आरक्षण गोलमेज परिषद झाली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, मराठा आरक्षण समन्वय समिती अध्यक्ष विजयसिंह महाडिक, सुधाकर माने (लातूर), धनाजी येळकर-पाटील (पुणे), दिग्विजय मोहिते (इस्लामपूर), रवी पाटील (सातारा), अनिल वाघ (नाशिक), वंदना मोरे, मेघा मोरे (खोपोली) आदी उपस्थित होते. सहा ठराव एकमताने मंजूर झाले.
सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरात लवकर स्थगिती उठावी. आपण वेगवेगळे लढलो तर, इतिहासाची पुरावृत्ती होईल. एकत्रित येऊनच आरक्षणाचा लढा पुढे लढावा लागणार आहे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.