चला नशा हद्दपार करू! कोरोना व्यसनमुक्तीसाठी इष्टापत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:08 AM2020-05-11T11:08:35+5:302020-05-11T11:11:08+5:30

व्यसन सुटावे, असे अनेकांची इच्छा असते; परंतु कुठल्या ना कुठल्या कारणाने व्यसन सुटत नाही. कोरोनाचा लॉकडाऊन आणि त्यामुळे झालेली दारूबंदी हा काळ व्यसनापासून अलिप्त होण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. - उदय चव्हाण, समुपदेशक, परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था,सातारा

Let's get rid of drugs! Corona addiction | चला नशा हद्दपार करू! कोरोना व्यसनमुक्तीसाठी इष्टापत्ती

चला नशा हद्दपार करू! कोरोना व्यसनमुक्तीसाठी इष्टापत्ती

Next
ठळक मुद्दे परिवर्तनचा जागरसंडे स्पेशल मुलाखत

सचिन काकडे ।

ज्याला व्यसनापासून मुक्त व्हायचं आहे, त्या व्यक्तीचा दृढनिश्चय अत्यंत आवश्यक असतो. व्यसनाची कुठलीही वस्तू डोळ्यासमोर आली अथवा तिचा विचार जरी मनात आला आणि ती बाजारात सहजरीत्या उपलब्ध झाली, तरी मनुष्य स्वत:ला रोखू शकतो. मात्र, त्यासाठी मनाचा दृढनिश्चय अत्यावश्यक आहे. इतकी कळ काढलीत तर आणखी काही काळ धीर धरा... खरंच प्रत्येक व्यक्ती जी मनापासून व्यसनमुक्त होण्याची इच्छा बाळगून आहे, ती नक्की यशस्वी होऊ शकते.

प्रश्न : व्यसनमुक्ती संदर्भाने परिवर्तनची भूमिका काय आहे?
उत्तर : परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था ही गेली पंचवीस वर्षे साताऱ्यात प्रबोधन, संघर्ष, उपचार यावर डॉ. शैला दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाने काम करत आहे. व्यसनाधिन व्यक्तीमुळे कुटुंबाचे हाल होतात ते जाणूनच हे काम चालू केले व आजवर कित्येक कुटुंबे सुखी संसार करतात.

प्रश्न : व्यसन सुटायला किती कालावधी लागतो?
उत्तर : व्यसन हा असा आजार आहे की तो पुन:पुन्हा उद्भवतो. त्याला जगात कोठेही औषध नाही. मात्र, मनाचा संयम उपयोगी ठरतो. त्यामुळे ठराविक कालावधीत व्यसन सुटते. हे निश्चित सांगता येत नाही; पण लॉकडाऊनच्या परिस्थितीचा व त्या काळात मनाची स्वीकार क्षमता एकत्र करून मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने संधीचे सोने करू शकता.

प्रश्न : व्यसनमुक्त होण्याची इच्छा असणाऱ्यांनी सध्या काय करावे?
उत्तर : कुठलीही व्यसनाची वस्तू आपल्याला मिळणारच नाही, ही परिस्थिती मनाने स्वीकारली आहे. तसेच आपण व्यसन नाही केले तरी आपल्यावर काही फार मोठ-मोठे संकट नाही आलं, त्यामुळे थोडा संयम व शास्त्रीय उपचाराने व्यसन मुक्त होणं शक्य आहे.


व्यसनमुक्तीची हीच खरी संधी
व्यसन व्यसनी व व्यसनाधीन या टप्प्यातून व्यसनाचा विचार केला तर सध्या व्यसनाधीन लोकांची अवस्था बिकट झालेली दिसते. याचे कारण दारू वरचे त्यांचे अवलंबित्व वाढले आहे. लॉकडाऊन हा कालावधी आपल्याला बरेच काही शिकण्याची संधी देतोय तसेच ज्यांनी आपल्या व्यसनाच्या इच्छेवर मात केली आहे, त्यांना व्यसनमुक्तीची संधी देत आहे.
प्रशासनालाही मोठा हातभार लागेल

कोरोनामुळे अनेकांनी मनात घेतलेली भीती आणि त्यामुळे निर्माण झालेले मानसिक आजार यांच्याशी सामना करण्यासाठी प्रशासनाने हेल्पलाईन सुरू केलेली आहे. मानसोपचार तज्ज्ञांची मार्गदर्शन मिळत असल्याने अनेकजण भीतीतून बाहेर पडलेत. याच धर्तीवर प्रशासनाने व्यसनमुक्तीसाठी ‘परिवर्तन’ या संस्थेची मदत घेतली तर व्यसनमुक्तीचे कामही या माध्यमातून सहजरीत्या होऊ शकेल.

 

Web Title: Let's get rid of drugs! Corona addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.