चला लसीकरण करूया, लोणंद कोरोनामुक्त बनवूया..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:40 AM2021-04-07T04:40:29+5:302021-04-07T04:40:29+5:30
लोणंद : चला लसीकरण करूया, लोणंद कोरोनामुक्त बनवूया... हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून १०० दिवसात लोणंद शहराचे १०० टक्के लसीकरण ...
लोणंद : चला लसीकरण करूया, लोणंद कोरोनामुक्त बनवूया... हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून १०० दिवसात लोणंद शहराचे १०० टक्के लसीकरण करण्याच्या उद्देशाने डॉ. नितिन सावंत यांच्या संकल्पनेतून या उपक्रमास लोणंदमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरुवात करण्यात आली.
सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती खंडाळा व सुवर्णगाथा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण मोहिमेचा उद्धघाटन समारंभ आमदार मकरंद पाटील यांच्याहस्ते झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.
कार्यक्रमास लोणंद नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सचिन शेळके, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दयाभाऊ खरात, लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी प्रशांत बागडे, गटनेते हणमंतराव शेळके, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण शेळके, सुभाष घाडगे, शिवाजीराव शेळके, गणीभाई कच्छी, राजाभाऊ खरात, आरोग्य सेविका व नागरिक उपस्थित होते.
लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात सर्व सुविधांनियुक्त भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी ४५ वर्षांपुढील नागरिकांचे रजिस्ट्रेशन करून त्यांचे सुरक्षित लसीकरण केले जात आहे. नागरिकांना बसण्याची सोय करण्यात आली असून, लसीकरण झाल्यानंतर पाणी व सरबत देण्याची सोय करण्यात आली आहे. आज लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी दुपारपर्यंत दीडशेहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. या मोहिमेत सुवर्ण गाथा या मोहिमेअंतर्गत पाहिल्याच मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी १० ते १ च्या दरम्यान ११० नागरिकांनी कोवॅक्सिन लस घेतली. पुन्हा २ ते ५ दरम्यान लसीकरण करण्यात येत असून, अनेकांनी सुवर्णगाथा प्रतिष्ठान व राष्ट्रवादीच्या स्वयंसेवकांचे तसेच डॉ. नितीन सावंत यांचे आभार मानले.
सुवर्णगाथा प्रतिष्ठान व इतर सामाजिक संस्थांचे शंभर ‘कोविन मित्र’ स्वयंसेवक तयार करण्यात आले असून, पुढील शंभर दिवस हे कोविन मित्र लसीकरण करण्यासाठी मदत करणार आहेत. दररोज किमान चारशे लोकांचे लसीकरण करून लोणंदमध्ये शंभर टक्के लसीकरण करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.