ढगफुटीने पेरण्या रखडल्या
By admin | Published: June 13, 2015 11:55 PM2015-06-13T23:55:44+5:302015-06-13T23:55:44+5:30
चार दिवसात ‘निसर्ग कोपला आणि बळीराजा झोपला
कातरखटाव : तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसात ‘निसर्ग कोपला आणि बळीराजा झोपला,’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
गेली पाच वर्षे या भागात मान्सूनच्या लपंडावामुळे खरीप हंगामातील बाजरी, कापूस, मूग, मटकी, भुईमुगाची पेर नाही, त्यामुळे शेतकरी चिंतातुर आहे. कृषी विभागाकडून शेतक ऱ्यांना मार्गदर्शन सुरू आहे. जूनच्या प्रारंभी पावसाने दमदार हजेरी लावली तर बाजरी, भुईमूग, कपाशी या पिकांना चांगली गती आली असती असे शेतक -यांचे म्हणणे आहे.याशिवाय पावसाने पाठ फिरवल्यास खरीप हंगाम धोक्यात आहे, अशी चिंता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
एकंदरीत ढगफुटीसारख्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचे शेतमशागतीचे कष्ट वाया गेले आहे. शेतात चिखल झाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले तर काही ठिकाणी शेतात पाणीच पाणी झाल्यामुळे अजून पंधरा दिवस तरी वापसा येणार नसल्याने या भागातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. (वार्ताहर)