स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत घडवूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:42 AM2021-08-24T04:42:29+5:302021-08-24T04:42:29+5:30

सातारा : ‘स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्योत्तर काळात स्वप्ने उराशी बाळगली होती. त्या स्वप्नांचा भारत निर्माण करण्यासाठी सध्याचा काळ ...

Let's make India the dream of freedom fighters and revolutionaries | स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत घडवूया

स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारकांच्या स्वप्नातील भारत घडवूया

googlenewsNext

सातारा : ‘स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्य चळवळीत व स्वातंत्र्योत्तर काळात स्वप्ने उराशी बाळगली होती. त्या स्वप्नांचा भारत निर्माण करण्यासाठी सध्याचा काळ कठीण असला तरी पोषक आहे. ही संधी समजून परिवर्तनवादी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हेच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन ठरेल’, असा निर्धार करण्यात आला.

सातारा येथे परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्यावतीने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ. शेख काका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रा. डॉ. भास्कर कदम, बाबुराव शिंदे, प्रकाश खटावकर यांच्या हस्ते कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्याचा आढावा विजय मांडके यांनी घेतला. ‘सातारा शहरातील पुरोगामी चळवळीची सद्यस्थिती व पुढील वाटचाल’ या विषयावर मीनाज सय्यद यांनी मांडणी केली.

यावेळी बाबुराव शिंदे म्हणाले, ‘परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्तेच आताच्या घडीला प्रतिगाम्यांच्याविरोधात संघर्ष करु शकतात. त्यांना सर्व धर्मनिरपेक्षवादी कार्यकर्त्यांनी व संघटनांनी, पक्षांनी ताकद दिली पाहिजे.’

प्रा. सुनील गायकवाड, जयंत उथळे, गणेश दुबळे, रवींद्र शिवदे, विजय पवार, उमेश खंडुझोडे, राहुल गंगावणे, महेश गुरव, शुभम ढाले यांनी आपापल्या संघटनांनी केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी युवराज जाधव, अनिल मोहिते, दिलीप ससाणे, तौसिफ शेख, ज्ञानेश्वर कदम, जयप्रकाश जाधव उपस्थित होते.

फोटो २३ नरेंद्र दाभोलकर

सातारा परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्यावतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. शेख काका यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विजय मांडके, बाबुराव शिंदे, प्रा. डॉ. भास्कर कदम, प्रकाश खटावकर उपस्थित होते.

Web Title: Let's make India the dream of freedom fighters and revolutionaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.