वृक्ष फुलवूया, निसर्ग वाढवूया...

By admin | Published: March 27, 2017 04:56 PM2017-03-27T16:56:05+5:302017-03-27T16:56:05+5:30

गौरीशंकरच्या सुखात्मे स्कूलच्या विद्याथ्यार्चा निर्धार

Let's plant the tree, increase the nature ... | वृक्ष फुलवूया, निसर्ग वाढवूया...

वृक्ष फुलवूया, निसर्ग वाढवूया...

Next

आॅनलाईन लोकमत
सातारा : वृक्ष सतत मायेची सावली देत असतात. त्याचबरोबर पृथ्वीवरील प्रत्येक सजीवसृष्टीला आॅक्सिजन रुपी जीवन देतात. म्हणून वृक्ष हे आमचे खरे दैवत हा भाव मनी ठेवून गौरीशंंकर नॉलेज सिटीच्या डॉ़ पी़ व्ही़ सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लिंबच्या कॅम्पसमध्ये वृक्षांच्या पूजनाने जागतिक वनदिन साजरा केला़


वृक्ष तोड व जंगल तोडीमुळे पृथ्वीचे तपमान वाढले असून, विनाशाकडे होणारी वाटचाल रोखण्यासाठी वृक्षसंवर्धन महत्त्वाचे ठरणार आहे़ यासाठी ह्यझाडे लावा, झाडे जगवाह्ण हा संदेश कृतीतून डॉ़ पी़ व्ही़ सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. कॅम्पसमध्ये विविध वृक्षांची देखभाल करतानाच वृक्ष वाढीलाही या विद्यार्थ्यांकडून चालना दिली जात आहे़ वृक्षांशी या विद्यार्थ्यांचे ऋणानुंबुधाचे नाते निर्माण झाले आहे़ विद्यार्थ्यांनी हे नाते वृक्ष पुजनातून दाखवून दिले आहे़ सृष्टीतील सजीवांचे अस्तित्व वृक्षावर व जंगल संपत्तीवर अवलंबून आहे़ हे या छोट्या विद्यार्थ्यांनी जाणले आहे़


सृष्टीतील ओझोन वायूचे घटते प्रमाण हे सजीव सृष्टीसाठी धोकादायक ठरत आहे़ वृक्ष चळवळ वाढवून निसर्ग फुलवूया हा संदेश देत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जागतिक वन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला़ यासाठी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, स्कूलच्या प्राचार्या डॉ़ पटेल यांनी या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले़ (प्रतिनिधी)

Web Title: Let's plant the tree, increase the nature ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.