चला एकत्रितपणे त्यांचा अधिवास सुरक्षित करू-वणवामुक्तीसाठी सातारकरांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:29 PM2019-12-28T23:29:36+5:302019-12-28T23:30:22+5:30

सातारकर संवेदनशील आहेत. ‘लोकमत’ने केलेले आवाहन आणि वनविभागाच्यावतीने केलेल्या जनजागृतीमुळे अनेक हात वणवामुक्तीसाठी पुढे सरसावले आहेत. - डॉ. भारतसिंग हाडा, उपवनसंरक्षक अधिकारी

Let's secure their occupation together | चला एकत्रितपणे त्यांचा अधिवास सुरक्षित करू-वणवामुक्तीसाठी सातारकरांना आवाहन

चला एकत्रितपणे त्यांचा अधिवास सुरक्षित करू-वणवामुक्तीसाठी सातारकरांना आवाहन

Next
ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद

प्रगती जाधव-पाटील।
सातारा : केवळ गंमत म्हणून किंवा चुकीच्या समजुतीमुळे लोक वणवा लावतात. या गमतीचा बराच दुरोगामी परिणाम वनांवर आणि पर्यायाने निसर्गावर होत असल्याचे ‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांत मांडले. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ आणि सातारा वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वणवामुक्तीसाठी श्रमदान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रश्न : वणवामुक्तीचा परिणाम कुठंपर्यंत दिसणार आहे?
उत्तर : सातारा जिल्ह्यात समृद्ध डोंगररांगा आहेत. या रांगा दरवर्षी वणव्याच्या आगीत होरपळत असतात. याने होणाऱ्या पर्यावरणीय हानीची गिनती कशातच होऊ शकत नाही. जिल्ह्यातील प्रत्येकाने वणवा रोखण्यासाठी आपापल्या हद्दीत प्रयत्न केले तरीही हजारो हेक्टर पसरलेले डोंगर आणि त्यातील सजीवांचे अस्तित्व धोक्यात येण्यापासून वाचू शकते. वणवामुक्तीचा सातारकरांनी घेतलेला ध्यास आणि त्यातून वणवा रोखला गेला तर ते राज्यासाठी रोलमॉडेल ठरेल.

प्रश्न : वणवामुक्तीचा उपक्रम कसा सुरू करण्यात येणार आहे?
उत्तर : नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण अनोखे संकल्प करतात. यंदा सातारकरांनी वणवामुक्तीचा संकल्प केला आहे. प्राथमिक स्तरावर अजिंक्यतारा आणि भैरोबाचा पायथा या दोन डोंगरांवर जाळरेषा काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी वनविभागाचे दहा कर्मचारी आणि दहा स्वयंसेवकांची आवश्यकता आहे. सलग पाच दिवस दोन तास

श्रमदान तर जाळरेषा काढणं सहज शक्य आहे.
प्रश्न : जाळरेषा काढण्यासाठी नागरिकांनी सोबत काय आणावे?
उत्तर : जाळरेषा काढण्यासाठी येणाºया नागरिकांना औजारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्वत:बरोबर पाण्याची बाटली आणि डोक्यावर टोपी या दोन बाबीच त्यांनी सोबत आणावी.

  • वन्यप्राण्यांचा रहिवासही सुरक्षित

वनवणव्यामुळे सर्वाधिक धोका पोहोचतो तो वन्यप्राण्यांना. सरपटणाºया प्राण्यांबरोबरच पक्षी आणि किडे मुंग्यांचाही होरपळून मृत्यू होतो. वणवे रोखण्यासाठी यंदा सामान्यांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकांमध्ये या अनुषंगाने जनजागृती निर्माण केल्याने वणवा रोखणं शक्य आहे. त्या माध्यमातून वन्यप्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहील, हे नक्की!

  • ग्रामस्थांची वणवामुक्तीसाठी शपथ

सातारा जिल्ह्यातील डोंगर पायथा परिसरात राहणाºया शेकडो गावांना तिथल्या वनरक्षक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वणवामुक्तीची शपथ देण्यात आली आहे. ग्रामस्थांनी वणवा लावणाºयांना प्रतिबंध करून वनांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. डोंगराच्या पायथ्याखाली राहणाºया प्रत्येक ग्रामस्थांचे यासाठी प्रबोधनही करण्यात आले आहे. त्याला ग्रामस्थाचांही प्रतिसाद मिळतो.

Web Title: Let's secure their occupation together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.