शेरेचीवाडी ग्रामविकास पथदर्शी ठरवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:07+5:302021-07-07T04:48:07+5:30
वाठार निंबाळकर : ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायत ही गावच्या विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करत आहे. त्यांनी ग्रामविकासासाठी ठेवलेले ध्येय ...
वाठार निंबाळकर : ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायत ही गावच्या विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करत आहे. त्यांनी ग्रामविकासासाठी ठेवलेले ध्येय व यासाठी ग्रामस्थांची असलेली एकजूट निश्चितपणे दिशादर्शक अशी आहे. शासन, प्रशासन व लोकसहभाग या मार्गांनी होत असलेल्या प्रयत्नांमुळे हे गाव निश्चितपणे भविष्यात ग्रामविकासाचे पथदर्शी ठरेल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले.
शेरेचीवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे, पंचायत समिती. सदस्य राहुल शिंदे, सरपंच दुर्गादेवी, रविंद्र नलवडे,
ग्रामपंचायत सदस्या राणी चव्हाण, अभिजित मोहिते, शीतल फडतरे, महेश बिचुकले, तलाठी विनायकराव गाडे, ग्रामसेविका मोनिका मुळीक, श्रीरंग चव्हाण, उज्ज्वला गुरव, दिनकर चव्हाण, दीपक नलवडे, राहुल नलवडे, हंबीरराव मोहिते, लालासाहेब नलवडे, ज्योतिराम चव्हाण, स्नेहल मोहिते, संदीप शिंदे, दशरथ ढेंबरे, सचिन शिंदे, संदीप पवार, सुकुमार नलवडे, मनोहर मोहिते, बाळासाहेब ढवळे, अंकित नलवडे, प्रतीक चव्हाण, सूरज नलवडे, सचिन मोहिते, दिलीप जगदाळे, दादासाहेब रिटे, राम घाडगे, विठ्ठल माने, सुहास डांगे, संतोष मोहिते उपस्थित होते.
फडतरे म्हणाले, ‘पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.’
उपसभापती संतोष साळुंखे म्हणाले, ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी यांनी विकासकामांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून गावच्या सर्वांगीण विकासाकरिता लाखोंचा निधी मंजूर केला आहे. यामुळे गावच्या विकासाला निश्चितपणे दिशा मिळणार आहे. शेरेचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासाच्या अनुषंगाने शासनाच्या प्रत्येक योजना प्रभावीपणे राबवून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’
हणमंतराव चव्हाण यांनी प्रास्तविक केले. संजय ढेंबरे यांनी स्वागत केले. विक्रमसिंह नलवडे यांनी आभार मानले.