आणे येथे विलगीकरण कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:56+5:302021-06-19T04:25:56+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील आणे येथे वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कोळे यांचे संयुक्त विद्यमान ...
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील आणे येथे वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कोळे यांचे संयुक्त विद्यमान आणे येथे तीस बेडचे विलगीकरण कक्ष सर्व सोयींनीयुक्त सुरू करण्यात आले आहे. प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी कोरोनाकाळात महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या लोकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
आणेसह कोळे परिसरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहेत. परिणामी आणे येथे तीस बेडचे विलगीकरण कक्ष सुरू केले आहे. या ठिकाणी पाच सुस्थितीतील ऑक्सिजन मशीन, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, सॅनिटायझर आणि औषधोपचारासह शासकीय निकषानुसार सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
या वेळी इंद्रजित चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले यांनीही मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधिकारी सुनीता थोरात, सरपंच आशाताई अनेकर, विकास सोसायटीचे चेअरमन सदाशिव चव्हाण, जयवंतराव पाटील, ग्रामसेवक महादेव माने, भरत देसाई, लक्ष्मण देसाई, भाऊसाहेब देसाई, तारूबाई देसाई उपस्थित होत्या.