जावलीत वनविभागाकडून कोल्ह्यास जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:35 AM2021-03-14T04:35:07+5:302021-03-14T04:35:07+5:30
फलटण : फलटण तालुक्यातील जावली येथील लिंबाबा मंदिराच्याजवळील एक विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले. याबाबत ...
फलटण : फलटण तालुक्यातील जावली येथील लिंबाबा मंदिराच्याजवळील एक विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले.
याबाबत माहिती अशी की, भुकेने आणि तहानेने व्याकूळ झालेला कोल्हा फिरत फिरत जावली सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र गावडे यांच्या विहिरीजवळ आला. पाणी पिण्याच्या नादात तो विहिरीत पडला. ही बाब गावडे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर वनविभागाचे कर्मचारी तेथे आले. त्यांनी पाण्यात जाऊन त्याला बाहेर काढले.
भुकेने व्याकूळ झालेला कोल्हा बाहेर काढल्यानंतर धूम ठोकून पळून गेला.
यावेळी वनरक्षक बबन राठोड, मंगेश कर्वे, सचिन जाधव, अभिजित निकाळजे, रजत मांडरे, ओम निमगिरे आदींनी विशेष परिश्रम घेऊन हा कोल्हा सुखरूप बाहेर काढला. यावेळी रामचंद्र गावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.