जीवनदात्यावरच ओढवला मृत्यू!

By admin | Published: February 20, 2015 09:47 PM2015-02-20T21:47:39+5:302015-02-20T23:14:31+5:30

अजनूजजवळ अपघात : जीपच्या धडकेत खंडाळ्याच्या रेस्क्यू टीम जवानाचा मृत्यू

Life on the life of the deceased! | जीवनदात्यावरच ओढवला मृत्यू!

जीवनदात्यावरच ओढवला मृत्यू!

Next

शिरवळ/खंडाळा : पुणे-बंगळूर महामार्गावर कुठेही अपघात झाला तर ‘तो’ धावून येत असे. या जीवनदात्या ‘तेजस’ वरच काळाने असा घाला घातला. खंडाळा रेस्क्यू टीमचा सभासद असणारा तेजस दत्तात्रय ढमाळ (वय २३) याचा अपघातात झालेला मृत्यू अनेकांना धक्का देऊन गेला आहे. खंडाळा ते असवली रस्त्यावर अजनूज गावच्या हद्दीतील ओढ्याजवळून तेजस त्याच्या दुचाकीवरून निघाला होता. जीपने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरून तो खाली आदळला. या अपघाताच त्याचा मृत्यू झाला. याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असवली, ता. खंडाळा येथील तेजस दत्तात्रय ढमाळ (वय २३) हा गुरुवारी (दि. १९) नऊ वाजण्याच्या सुमारास खंडाळाहून असवलीकडे जात असताना अजनूज गावाजवळील ओढ्याजवळ समोरून येणाऱ्या जीपने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात तेजस गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्यास उपचारासाठी शिरवळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तेजस ढमाळ हा तरुण खंडाळा पोलिसांनी नव्याने बनविलेल्या खंबाटकी अपघात मदत पथकातही सदस्य झाला होता. अनेक अपघातांमध्ये तो अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जात असे. या अपघाताची खबर प्रवीण धर्मराज ढमाळ यांनी खंडाळा पोलिसांत दिली असून, याबाबत अधिक तपास सहायक फौजदार जाधव करीत आहेत.दरम्यान, खंडाळा परिसरात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असली की विवंचनेत पडलेल्या लोकांसाठी धावून जाण्यात तेजस आपले कर्तव्य मानायचा. असवलीतील दत्तात्रय ढमाळ यांचा तो एकुलता एक मुलगा. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही दुसऱ्यासाठी धडपडण्यात तत्पर असायचा. त्याच्या अशा प्रकारे जाण्याने सर्वचजण दु:खात आहेत. (प्रतिनिधी)

वाढदिवसाच्या तिसऱ्याच दिवशी मृत्यूशी गाठ
तेजसेचा बुधवार, दि. १८ रोजी २२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या तिसऱ्याच दिवशी त्याला मृत्यूने गाठल्याचा दुर्दैवी योगायोग घडला आहे. विशेष म्हणजे, अपघातानंतर तेजसला वैद्यकीय मदत मिळाली तिही तुटपुंजी. यामध्ये गंभीर झालेल्या तेजसचा मृत्यू झाला. तेजसचे वडील ट्रान्सपोर्टमध्ये चालक आहेत. ते कामानिमित्त ते चेन्नई येथे गेले होते. खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व ग्रामस्थांनी या अपघाताची माहिती तेजसचे वडील काम करत असलेल्या ट्रान्सपोर्ट मालकाला दिल्यानंतर त्याने त्यांच्यासाठी माणुसकी दाखवित विमानाची सोय केली.

Web Title: Life on the life of the deceased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.