आयुष्य लॉक, पेट्रोल दरवाढ अनलॉक; तीस वर्षांत लीटरमागे ८० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:38 AM2021-05-14T04:38:45+5:302021-05-14T04:38:45+5:30
टेम्प्लेट लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : इंधनाची दरवाढ झाली की महागाईचा विस्फोट होत असतो. गेल्या तीस वर्षांमध्ये लीटरमागे ८० ...
टेम्प्लेट
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : इंधनाची दरवाढ झाली की महागाईचा विस्फोट होत असतो. गेल्या तीस वर्षांमध्ये लीटरमागे ८० रुपये इतकी मोठी पेट्रोलची दरवाढ झालेली आहे. कोरोनामुळे लोकांचे आयुष्य लॉक झाले असले तरी पेट्रोलची दरवाढ मात्र अनलॉक स्थितीत आहे.
पेट्रोलचा दर लीटरमागे शंभरच्या जवळ जाऊन पोहोचलेला आहे. सर्वसामान्य लोकांना ही दरवाढ न परवडणारी असल्यामुळे लोक आता वाहनाचा कमीत कमी वापर करीत आहेत; परंतु एखादी वस्तू आणायची म्हटले किंवा अगदीच गरजेच्या वेळी वाहन वापरण्याशिवाय पर्याय राहत नसतो. सध्याच्या महागाईच्या काळामध्ये इंधन दरवाढ झाल्याने गरजेच्या वस्तूदेखील खूप महागल्या आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर आहेत त्यांना अल्प पगारात काम करावे लागत आहे. पोटाला चिमटा देऊन लोक वाहनात पेट्रोल टाकत आहेत. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन इंधन दरवाढ आटोक्यात आणली नाही तर सर्वसामान्यांचे जगणे अत्यंत वेदनादायी होऊन जाईल.
तेलाच्या किमतीपेक्षा टॅक्स जास्त
इंधनावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी असतानादेखील शासन त्याबाबत निर्णय घेत नाही. राज्याचे वेगळे आणि केंद्राचे वेगळे कर आहेत. कच्च्या तेलाचे भाव बॅरलमागे ५ हजार ६० रुपये इतके कमी असतानादेखील पेट्रोलचे दर मात्र वाढतच आहेत. इंधन शुद्ध करण्याची प्रक्रिया इतकी महाग नाही. मात्र केंद्र आणि राज्य शासनाचे करच मोठे आहेत. हे कर कमी करण्यासाठी ना राज्यशासन पुढाकार घेते ना केंद्रशासन. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बोकांडी बसलेले इंधन दरवाढीचे भूत काही उतरायला तयार नाही.
पुन्हा सायकलवर फिरावे लागणार
कोट
मी औद्योगिक वसाहतीत कामाला आहे. कामाला जायचे म्हटले तर वीस किलोमीटरचे अंतर कापून यावे लागते. वाहनांची सोय नसल्याने खासगी वाहन वापरण्याशिवाय पर्याय नाही. पेट्रोल दरवाढ झाली असली तरी पगार तेवढाच असल्याने निम्मा पगार पेट्रोल वर जातोय.
- तेजस शिर्के
कोट
पहिलं कामावर जाताना उतार मिळेल तिथे आऊट ऑफ मारत होतो. आता आऊट ऑफ जास्त आणि गाडी चालू कंडिशन मध्ये कमी वेळेला असते. मात्र चढावर गाडी सोडणार तरी कशी ? त्यामुळे गाडी नेण्याचे आता टाळू लागलो आहे.
- मंगेश गुरव
कोट
गाडी वापरणे आता परवडत नसल्याने जुनी सायकल दुरुस्त करून घेतली आहे. सातारा शहरातील चढ-उतार बघता सायकल वापरणे अत्यंत धोकादायक आहे, मात्र, पेट्रोल दरवाढीमुळे हा धोका पत्करावा लागत आहे. दुसरा पर्याय सर्वसामान्यांकडे राहीलाच नाही.
- प्रवीण पवार
पेट्रोलचे दर प्रति लीटर
१९९१ - १४.६२
२००१- २८.७
२०११- ६३.३७
२०२१ -