वृत्तपत्र वितरकांचे जीवन अधिक कष्टप्रत ! शेखर चरेगावकर; कºहाडात वृत्तपत्र, दूध वितरकांचा मेळावा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:34 PM2018-01-01T23:34:36+5:302018-01-01T23:34:46+5:30

कऱ्हाड : ‘ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता वेळेत वृत्तपत्र व दूध पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र व दूध वितरकांकडून केले जाते. या व्यक्ती अनेक अडचणींवर मात करीत आपला व्यवसाय

 Life of newspaper distributors more troublesome! Shekhar Chargaonkar; The newspaper, the distributors of milk, and the merchandise meet | वृत्तपत्र वितरकांचे जीवन अधिक कष्टप्रत ! शेखर चरेगावकर; कºहाडात वृत्तपत्र, दूध वितरकांचा मेळावा उत्साहात

वृत्तपत्र वितरकांचे जीवन अधिक कष्टप्रत ! शेखर चरेगावकर; कºहाडात वृत्तपत्र, दूध वितरकांचा मेळावा उत्साहात

Next

कऱ्हाड : ‘ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता वेळेत वृत्तपत्र व दूध पोहोचविण्याचे काम वृत्तपत्र व दूध वितरकांकडून केले जाते. या व्यक्ती अनेक अडचणींवर मात करीत आपला व्यवसाय करीत असतात. यातील वृत्तपत्र वितरकांचे जीवन हे कष्टप्रत आहे. त्यांनी आपल्यात बदल घडविणे आज गरज आहे,’ असे मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले.

कऱ्हाड येथे वृत्तपत्र वितरक व दूध वितरक यांचा सोमवारी सायंकाळी स्नेहमेळावा पार पडला. याप्रसंगी शेखर चरेगावकर बोलत होते. मेळाव्यास महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, प्रमुख वृत्तपत्र वितरक मिलिंद भंडारे, महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटना सरचिटणीस बालाजी पवार, विनोद पन्नासे, कोल्हापूर संघटनेचे सचिव रघुनाथ कांबळे, किरण वणगुत्ते, गोरख भिलारे, यशवंत बँकेचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत चव्हाण, यशवंत बँकेचे

मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, नगरसेवक घनश्याम पेंढारकर, मुकुंद चरेगावकर प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विके्रता संघटनेच्या वतीने राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा सत्कार केला.

बालाजी पवार म्हणाले, ‘वृत्तपत्र विक्रीबरोबर इतर व्यवसायही करणे आज वितरकांपुढे काळाची गरज बनली आहे. वर्षाचे ३६५ दिवस हे वृत्तपत्र वितरक काम करीत असतात.’ सुनील पाटणकर म्हणाले, ‘लवकरच वृत्तपत्र व दूध वितरकांना अच्छे दिन येतील. वर्धा शहरात ३५ हजार वृत्तपत्रांचे वितरण केले जाते. वृत्तपत्र वितरण व्यवसायाबरोबर दुसरे कोणकोणते व्यवसाय तसेच सेवा देता येतील? याचा विचार संघटनेच्या माध्यमातून सध्या केला जात आहे.’ यावेळी कऱ्हाड येथील प्रमुख वृत्तपत्र वितरक मिलिंद भंडारे यांनीही मनोगत व्यक्त केले.

जीवाचीही भीती वाटत नाही : विनोद पन्नासे
शासन व सरकार ज्या ठिकाणी पोहत नाहीत. त्या ठिकाणी वृत्तपत्र वितरक पोहचतात. अशी परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील वीस ते तीस किलोमीटर अंतर जंगलात जाऊन वृत्तपत्रे देताना नक्षवाद्यांचाही विचार करीत नाही. कधी कुठून गोळी लागेल याचा सुद्धा साधा आम्ही विचार करीत नसल्याची माहिती चंद्रपूर येथून आलेले विनोद पन्नासे यांनी यावेळी मेळाव्याप्रसंगी उपस्थितांना दिली.

कऱ्हाड येथे सोमवार सायंकाळी वृत्तपत्र व दूध वितरकांचा मेळावा पार पडला. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर, विकास सूर्यवंशी, बालाजी पवार, गोरख भिलारे, मिलिंद भंडारे आदी उपस्थित होते.

Web Title:  Life of newspaper distributors more troublesome! Shekhar Chargaonkar; The newspaper, the distributors of milk, and the merchandise meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.