आयुष्यातील महामॅरेथॉन अर्धवटच राहिली; साताऱ्यातील पत्रकार पांडुरंग पवार यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 11:08 PM2019-05-13T23:08:24+5:302019-05-13T23:08:29+5:30

सातारा : सातारा-लोणंद मार्गावर जरंडेश्वर नाका परिसरात भिक्षेकरी गृहाजवळ झालेल्या भीषण अपघातात पत्रकार व साताºयातील उत्कृष्ट मॅरेथॉनपटू पांडुरंग नामदेव ...

Life remains half-hearted; Pandurang Pawar, a journalist of Satara, died due to accident | आयुष्यातील महामॅरेथॉन अर्धवटच राहिली; साताऱ्यातील पत्रकार पांडुरंग पवार यांचे अपघाती निधन

आयुष्यातील महामॅरेथॉन अर्धवटच राहिली; साताऱ्यातील पत्रकार पांडुरंग पवार यांचे अपघाती निधन

Next

सातारा : सातारा-लोणंद मार्गावर जरंडेश्वर नाका परिसरात भिक्षेकरी गृहाजवळ झालेल्या भीषण अपघातात पत्रकार व साताºयातील उत्कृष्ट मॅरेथॉनपटू पांडुरंग नामदेव पवार (वय ४३ रा. धावडशी, ता. सातारा, सध्या रा. गुरुवार पेठ, सातारा) यांचा दुर्दैवी मत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राजेंद्र गायकवाड (वय ४६, रा. दौलतनगर, सातारा) आणि पत्रकार पांडुरंग पवार हे दोघे दुचाकीवरून नागेवाडी येथून रात्री पावणेबाराच्या सुमारास साताºयात येत होते. यावेळी राजेंद्र गायकवाड हे दुचाकी चालवत होते तर पांडुरंग पवार हे पाठीमागे बसले होते. जुना आरटीओ चौकापासून जवळ असलेल्या पुरुष भिक्षेकरी गृहासमोर आल्यानंतर समोरून आलेल्या कारने (एमएच ०३ बीएच ४१०४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. याचदरम्यान पाठीमागे असणाºया दुसºया कारची (एमएच ११ व्हीव्ही ७१९३) अपघातग्रस्त कारला धडक बसली. या अपघातामध्ये दुचाकीवरील राजेंद्र गायकवाड आणि पत्रकार पांडुरंग पवार हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पांडुरंग पवार यांना पुढील उपचारासाठी तत्काळ साताºयातील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पवार यांचा मृत्यू झाल्याचे समजताच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांसह पत्रकार यांच्यासह सातारा शहर पत्रकार संघ आणि तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पवार यांचे सहकारी राजेंद्र गायकवाड हेही या अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पत्रकार पांडुरंग पवार यांच्या अपघाती निधनामुळे साताºयाच्या पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. २० वर्षांपूर्वी धावडशी या आपल्या गावातूनच त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. विविध दैनिकातून ग्रामीण भागातील समस्या मांडून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले. धडपडी व हरहुन्नरी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी मॅरेथॉन स्पर्धेतही चुणूक दाखवली होती. पांडुरंग पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
दरम्यान, कारचालक मंगेश मोहन पवार (रा. शिवथर, ता. सातारा) याच्यावर निष्काळीजीपणा केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Life remains half-hearted; Pandurang Pawar, a journalist of Satara, died due to accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.