जखमी वानरावर उपचार करून जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:29 AM2021-02-22T04:29:15+5:302021-02-22T04:29:15+5:30
गोटे गावच्या हद्दीत वानरांच्या कळपांचा सतत वावर असतो. अतिथी हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वानर जागीच ठार झाले होते. ...
गोटे गावच्या हद्दीत वानरांच्या कळपांचा सतत वावर असतो. अतिथी हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने वानर जागीच ठार झाले होते. महामार्ग देखाभालचे पेट्रोलिंग इनचार्ज दस्तगीर आगा, दत्ता पाटील, वनाधिकारी अशोक मलप, महंमद आवटे, सागर पाटील, माजी उपसरपंच अल्लाउद्दीन देसाई, तंटामुक्ती अध्यक्ष धनाजी घारे, रमेश खुणे यांनी दुपारी जेसीबीच्या साह्याने खड्डा काढून त्या वानरावर विधिवत अंत्यसंस्कार केले. ही घटना ताजी असतानाच तिसऱ्या दिवशी गोटे येथेच सातारा ते कऱ्हाड लेनवर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. एका वानराला कारने धडक दिली. त्यामध्ये वानर जखमी झाले होते. पुन्हा दस्तगीर आगा तातडीने अपघातस्थळी आले. त्यांनी तातडीने महामार्ग सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील, राजू राजगे यांना माहिती दिली.
शरद देवरे, रमेश खुणे, धनाजी घारे यांच्या मदतीने पेट्रोलिंगच्या गाडीतून जखमी वानराला सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तातडीने उपचार करून त्या जखमी वानराला जीवदान दिले.