बंद ट्यूबांचा पालिकेत ‘उजेड’

By admin | Published: December 24, 2014 10:01 PM2014-12-24T22:01:50+5:302014-12-25T00:15:33+5:30

जागा पुरेना : लिलावपद्धतीने होणार विक्री

'Light' in closed tubes | बंद ट्यूबांचा पालिकेत ‘उजेड’

बंद ट्यूबांचा पालिकेत ‘उजेड’

Next

सातारा : शहरातील विद्युत खांबावर बंद पडलेल्या ट्यूबांचा खच पालिकेच्या टेरेसवर पडला असून, या ट्यूबांचा लिलाव होणार आहे. मात्र ट्यूबांचा लिलाव घेऊन त्यातून कवडीमोल रक्कम पदरात पडणार असल्याने पालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
शहरातील लाईटव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पालिकेतर्फे ट्यूब लाईट, मर्क्युरी लॅम्प, हायमॅक्सचे दिवे याद्वारे शहराला प्रकाश देण्याचा प्रयत्न केला जातो. फार पूर्वीपासून रस्त्यावर ट्यूबलाईट लावल्या जात होत्या. मात्र, कालांतराने अशा ट्यूबलाईट नामशेष होत गेल्या. या ट्यूबलाईटची जागा अत्याधुनिक अशा हायमॅक्सच्या दिव्यांनी घेतली; परंतु शहरात अद्यापही काही ठिकाणी रस्त्यावरील विद्युत खांबावर ट्यूबलाईट आहेत. सगळीकडेच हायमक्सचे दिवे लावणे पालिकेला परवडणारे नसल्यामुळे नादुरुस्त झालेल्या ट्यूबा काढून त्या जागी नवीन ट्यूबा बसविल्या जात आहेत.
शहरातील प्रमुख रस्ते व चौकात बसविलेल्या या ट्यूबलाईट काढून टाकण्यात आल्या आहेत. मुख्य रस्त्यांवर हायमॅक्स दिवे असले तरी शहरातील गल्ली बोळातच ट्यूबलाईट दिसत आहेत.
विविध रस्त्यांवरील ट्यूबा काढल्यानंतर त्याची कागदोपत्री नोंद करण्यासाठी त्या ट्यूबा पालिकेतील विद्युुत विभागात जमा कराव्या लागतात.
शहरातील निकामी व नादुरुस्त झालेल्या ट्यूबलाईटच्या नोंदी करण्यासाठी सर्व ट्यूबा पालिकेच्या टेरेसवर ठेवण्यात आल्या आहेत. या ट्यूबा बिनकामी असल्याने अनेक महिन्यांपासून टेरेसवर पडून आहेत. भंगारात याची कवडीमोल किंमत असल्यामुळे विद्युत विभाग या ट्यूबांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस टेरेसवर ट्यूबांचा खच वाढतच चालला आहे. (प्रतिनिधी)


चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा...
या ट्यूबा लिलावपद्धतीने भंगारात देण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले; परंतु या ट्यूबा भंगारात विकल्यास काचेच्या दराप्रमाणे म्हणजेच किलोला पन्नास पैसे दराने विकल्या जातील. त्यामुळे कोणता व्यावसायिक हा लिलाव घेऊन फायदा कमविणार, याची वाट पाहाणे म्हणजेच, चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा... ,अशी अवस्था पालिका विद्युत विभागाची झाली आहे.

Web Title: 'Light' in closed tubes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.