कातरखटाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:37+5:302021-07-18T04:27:37+5:30

कातरखटाव : खटाव तालुक्याच्या पूर्व भागात मागील काही दहा दिवसांपासून दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपून चालली होती. मात्र, ...

Light showers in Katarkhatav area | कातरखटाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी

कातरखटाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी

googlenewsNext

कातरखटाव : खटाव तालुक्याच्या पूर्व भागात मागील काही दहा दिवसांपासून दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपून चालली होती. मात्र, गेले चार दिवस झाले कातरखटाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने जोरदार सुरुवात केली होती. पिकांची उगवण उत्तम प्रकारे झाल्याने पिके शिवारात डोलदारपणे डोलत आहेत. अशातच पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे संकट येतेय की काय, अशी चिंता लागून राहिली होती. मात्र, बहरात आलेल्या पिकांना मोक्याच्या वेळी पावसाच्या हलक्या सरी पडल्याने मूग, मटकी, बाजरी, घेवडा, सोयाबीन या खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असून, पिके बहरात आहेत.

सध्या शिवारात जिकडे पाहावे तिकडे शेतकऱ्यांची कोळपणी व तण काढण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र, कमी दिवसात येणाऱ्या या पिकांना इथून पुढे पावसाच्या अशाच हलक्या सरी आणि पोषक हवामानाची गरज आहे. खटाव तालुक्यातील एनकूळ, खातवळ, कणसेवाडी, कान्हरवाडी, येलमरवाडी, पळसगाव, बोंबाळे, डाळमोडी, तडवळे, हिंगणे या गावांत, खेड्यापाड्यात कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मोठा पाऊस नाही बरसला तरी कमी प्रमाणात का होईना पण पावसाची गरज असल्याने कोरडवाहू जमिनीत कोळपणी योग्य प्रमाणात होईल, असे मत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

चौकट - शाळकरी मुलंही शिवारात...

कोरोना लॉकडाऊनमुळे, या महामारीमुळे शाळकरी मुलांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अजूनही ग्रामीण भागातील शाळकरी मुले अद्याप घरीच बसून असल्यामुळे इकडे-तिकडे टिवल्या बावल्या करीत असताना दिसत आहेत. पालकांच्या निदर्शनास आल्यामुळे आपला पाल्य आपल्या नजरेसमोर दिसत आहे. त्यामुळे शाळकरी मुले कोळपणीच्या कामात शेतात पालकांना मदत करताना दिसत आहेत.

१७कातरखटाव

फोटो - कातरखटाव परिसरातील शिवारात शेतकरी तण काढणे, कोळपणी करताना पाहायला मिळत आहेत. (छाया : विठ्ठल नलवडे)

Web Title: Light showers in Katarkhatav area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.